दिल्लीत बसलेले आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख नेते रिमोट कंट्रोलद्वारे पंजाब सरकारवर नियंत्रण ठेवत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, २४ मे रोजी केला. पंजाबचे राज्याचे मुख्यमंत्री कोणतेही नियंत्रण करू शकत नाहीत स्वतःचा निर्णय घेऊ शकत नाही, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.
गुरुदासपूरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “दुर्दैवाने पंजाबचा कारभार रिमोट कंट्रोलद्वारे केला जात आहे. दिल्लीचे दरबारी पंजाबवर राज्य करत आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री स्वतःहून निर्णय घेऊ शकत नाहीत. तिहार तुरुंगात जा तुमचे सरकार चालवण्यासाठी नवीन आदेश मिळतील. १ जूननंतर भ्रष्टाचारी पुन्हा तुरुंगात जाणार, पंजाब सरकार पुन्हा तुरुंगातून चालणार का?, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.
(हेही वाचा Manusmriti वेळीच शिकवली असती तर राष्ट्रवादी काँग्रेसवर फुटीची वेळ आली नसती; रमेश शिंदेंचा हल्लाबोल)
पंजाब इंडी अलायन्सचा खरा चेहरा
पंतप्रधान मोदी म्हणाले, पंजाब इंडी आघाडीचा खरा चेहरा जाणतो. या आघाडीमुळे पंजाबचे मोठे नुकसान झाले. फाळणी, अस्थिरता, दहशतवाद, पंजाबच्या बंधुत्वावर हल्ला, पंजाबमध्ये फुटीरतावाद आणि दिल्लीत शिखांची हत्या…इत्यादी पंजाबने पाहिले, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.
निवडणूक रॅलीत अटकेचा उल्लेख
एका निवडणूक रॅलीत झालेल्या अटकेचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले, “‘दिल्लीचे दरबारी’ पंजाब चालवत आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री स्वत: कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांचे ‘मालक’ तुरुंगात गेले आणि पंजाब सरकार बंद करू लागले. ” आणि दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप सुप्रिमो अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकण्यात आले. “या मातीची शपथ घेतो, मी देश नाहीसा होऊ देणार नाही. मी देशाला झुकू देणार नाही, देशाला थांबू देणार नाही.” मी देश थांबवू देणार नाही, असे पंतप्रधान (PM Narendra Modi) म्हणाले.
Join Our WhatsApp Community