Lok Sabha Election Results 2024 : चारसौ पार म्हणता म्हणता अडीचशेवरच मानावे लागणार समाधान ?; नितिशकुमारांची भूमिका निर्णायक

Lok Sabha Election Results 2024 : यूपीमधील 80 जागांपैकी भाजप 36 ते 40 जागांवर मर्यादित असल्याचे दिसत आहे, तर समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या युतीला 40 पेक्षा जास्त जागांवर आघाडी दिसत आहे.

184
Lok Sabha Election Results 2024 : चारसौ पार म्हणता म्हणता अडीचशेवरच मानावे लागणार समाधान ?; नितिशकुमारांची भूमिका निर्णायक
Lok Sabha Election Results 2024 : चारसौ पार म्हणता म्हणता अडीचशेवरच मानावे लागणार समाधान ?; नितिशकुमारांची भूमिका निर्णायक

लोकसभा निवडणुकीचे निकाल (Lok Sabha Election Results 2024) समोर येत आहेत. भाजपने ‘अबकी बार ४०० पार’ ची घोषणा केली असली, तरी भाजपला यंदा २५० जागांवरच समाधान मानावे लागेल कि काय, अशी स्थिती आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), महाराष्ट्र (Maharashtra), पश्चिम बंगाल (West Bengal) या मोठ्या राज्यांमधील भाजपच्या जागा मोठ्या संख्येने कमी झाल्याचे चित्र आहे. निकाल जाहीर होण्यास अद्याप वेळ असला, तरी भाजप बहुमतापासूनही दूर असल्याचे चित्र आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election Result: पालघरमध्ये भाजपाचा धुरळा! भारती कामडी यांचा दारुन पराभव)

भाजपला जवळपास 60 जागांचा फटका

अशा परिस्थितीत भाजपची संख्या सर्वांत मोठी असली, तरी सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना सहयोगी पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. अशा परिस्थितीत एनडीएने बहुमताचा आकडा पार केला, तरी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर अनेक मोठी आव्हाने असतील. यंदा भाजपला जवळपास 60 जागांचा फटका बसल्याचे दिसते. सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे अयोध्येत राममंदिराचे उद्घाटन होऊनही उत्तर प्रदेशात भाजप आणि एनडीएचे मोठे नुकसान झाले आहे. यूपीमधील 80 जागांपैकी भाजप 36 ते 40 जागांवर मर्यादित असल्याचे दिसत आहे, तर समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या युतीला 40 पेक्षा जास्त जागांवर आघाडी दिसत आहे.

मित्र पक्षांचा हात धरावा लागणार

भाजपला आता सरकार स्थापन करण्यासाठी मित्र पक्षांचा हात धरावा लागणार असल्याचे समोर येत असलेल्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. इंडि आघाडीलाही 225 च्या दरम्यान जागा आहेत. त्यामुळे मित्रपक्षांच्या मदतीला आता मोठे महत्त्व आले आहे. महायुतीचे मित्रपक्ष इंडि आघाडीसोबत गेल्यास सारेच चित्र बदलू शकते.

मित्रपक्षांची भूमिका महत्त्वाची

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जेडीयू हा भाजपचा महत्त्वाचा मित्रपक्ष आहे. त्यांना बिहारमधील राज्यातील 40 पैकी 15 जागांवर आघाडी मिळाली आहे, तर भाजप येथे 12 जागांवर मर्यादित असल्याचे दिसते. भाजपने 17 जागांवर निवडणूक लढवली असून नितीश यांच्या जेडीयूने 16 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. आता सर्वांच्या नजरा नितीश कुमार यांच्यावर आहेत, त्यांनी पुन्हा एकदा बाजू बदलली, तर ते किंगमेकर सिद्ध होऊ शकतात. नितीश कुमार यांच्याशिवाय तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) आंध्र प्रदेशातही मोठी कामगिरी केली असून पक्ष एकूण 16 जागांवर आघाडीवर आहे. अशा स्थितीत विरोधी पक्षांनी चंद्राबाबू नायडूंशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. तसेच एनडीएच्या इतर पक्षांनाही फोडण्याचे प्रयत्न केले जातील, असे चित्र आहे.

महत्त्वाच्या विषयांचे काय ?

2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 543 पैकी एकूण 282 जागा जिंकल्या होत्या. म्हणजे तिने स्वबळावर बहुमताचा आकडा पार केला होता. 2024 मध्येही भाजप बहुमताचा आकडा पार करेल, अशी आशा होती आणि यावेळीही 400 पार करण्याचा नारा देण्यात आला. यापुढे भाजपसाठी सर्वात मोठे आव्हान असेल, ते आपल्या अजेंड्यावर काम करणे. 2014 पासून भाजपने आपल्या सर्व अजेंडांवर काम केले आणि ते पूर्णही केले. आता समान नागरी संहिता (यूसीसी), वन नेशन वन इलेक्शन आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा यासारखे मोठे मुद्दे पक्षाच्या अजेंड्यावर होते. आता या विषयांची हाताळणी कशी होणार, हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल. (Lok Sabha Election Results 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.