लोकसभेसाठी Arvind Kejriwal यांचे मतदान, पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून कौतुक; केजरीवाल म्हणाले; तुमच्या देशाची काळजी करा…

चौधरी साहेब, मी आणि माझ्या देशातील जनता आपले प्रश्न हाताळण्यास पूर्णपणे सक्षम आहोत. तुमच्या ट्विटची गरज नाही, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

209

भारतात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे, शनिवार, २५ मे रोजी सहाव्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. मात्र या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापासूनच पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी हे निवडणुकीवर आक्षेपार्ह मते मांडून आवश्यक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनावले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी शनिवारी मतदानाचा हक्क गाजवला, त्यांनी त्याचा फोटो ट्विट केल्यावर त्यावरही चौधरी यांनी प्रतिक्रिया दिल्यावर केजरीवाल यांनी त्यांना सुनावले.

निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान काँग्रेस नेत्याने पाकिस्तानकडे अण्वस्त्रांचा साठा असल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर प्रत्युत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानकडील अण्वस्त्रे कुचकामी असून, ती वापरण्याइतका पैसाही त्या देशाकडे नाही. त्यामुळे ती विकून टाकण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे, असे म्हणत काँग्रेसला सुनावले होते. यावरुन पाकिस्तानी नेत्यांनीही भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य करण्यास सुरुवात केली. त्यावर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भाष्य केले.

(हेही वाचा Pune Porsche Car Accident: ‘बाळा’च्या आजोबांना अटक! ड्रायव्हरला धमकी देणे पडले महागात)

काय म्हणाले केजरीवाल? 

पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी हुसेन यांनी यापूर्वी राहुल गांधी यांचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता त्यांनी केजरीवाल यांचे कौतुक केले. दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी संपूर्ण कुटुंबासह जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कुटुंबासोबतचा एक फोटो पोस्ट केला.

यावर फवाज चौधरींनी केजरीवाल यांचा हा फोटो पुन्हा शेअर करून म्हटले, “शांतता आणि सद्भावनेसाठी द्वेष आणि अतिरेकी शक्तींचा पराभव करा.” यावर मुख्यमंत्री केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी चौधरींना प्रत्युत्तर दिले. “चौधरी साहेब, मी आणि माझ्या देशातील जनता आपले प्रश्न हाताळण्यास पूर्णपणे सक्षम आहोत. तुमच्या ट्विटची गरज नाही. सध्या पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. तुम्ही तुमच्या देशाची काळजी घ्या. भारतात होणाऱ्या निवडणुका हा आमचा अंतर्गत विषय आहे. भारत दहशतवादाच्या सर्वात मोठ्या प्रायोजकांचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही.”

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.