Lok Sabha Election 2024 : काँग्रेस आपमध्ये बिनसलं

दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचे प्रकरण प्रकाशझोतात आल्यापासून काँग्रेस आणि आप मधील दरी आणखी वाढली आहे.

196
हरियाणामध्ये Indi Alliance फुटली

दिल्ली आणि पंजाबमधील निवडणुकीची तारीख जवळ येत असतानाच काँग्रेस आणि आम आदमी पक्षातील नेत्यांनी एकमेकांकडे पाठ केली आहे. दोन्ही पक्षात काही तरी बिनसलं असून दोन्ही पक्षाचे नेते दिल्लीत एकमेकांच्या विरोधात उभे असल्याचे दिसून येत आहे. दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचे प्रकरण प्रकाशझोतात आल्यापासून काँग्रेस आणि आप मधील दरी आणखी वाढली आहे. आप आणि काँग्रेसमध्ये दिल्लीतील सात जागांवर आघाडी झाली आहे. आप चार तर काँग्रेस तीन जागा लढवीत आहे. (Lok Sabha Election 2024)

दिल्लीत सहाव्या टप्प्यात २५ मे रोजी मतदान होणे आहे. प्रचार रंगात आला आहे. भाजपा उमेदवारांचा आक्रमक प्रचार आणि जनतेचा मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे इंडी आघाडीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. अशातच स्वाती मालीवाल प्रकरणामुळे आपचा ग्राफ सापशिडीच्या खेळाप्रमाणे खाली घसरला आहे. काँग्रेसने दिल्लीत उद्या १८ मे रोजी रामलीला मैदानात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रचार सभा आयोजित केली आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Rajnath Singh: पाकिस्तानने भारताचे सामर्थ्य स्वीकारले आहे – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह)

मात्र, या सभेचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निमंत्रण दिलेले नाही. केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यापासूनच काँग्रेस अंतर राखून वागण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यात भर पडली ती मालीवाल प्रकरणाची. इंडी आघाडीतील नेत्यांनी सुटकेचे स्वागत केले होते. मात्र, राहुल गांधी यांनी साधे ट्विट सुद्धा केले नाही. या उलट लखनौमध्ये इंडी आघाडीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे पोहचले. पण केजरीवाल यांनी पाठ फिरविली. काँग्रेसला आरसा दाखविण्यासाठी केजरीवाल यांनी सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यामुळे दोन्ही पक्षात आलबेल नसल्याची चर्चा सुरु आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.