Raebareli LS Constituency : नाव मोठं दर्शन खोटं

159
Raebareli LS Constituency : नाव मोठं दर्शन खोटं
  • वंदना बर्वे

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ… मात्र जसा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीचा केला… मुलायमसिंग यादव यांनी सैफईचा केला… तसा रायबरेलीचा का झाला नाही? हा खरा प्रश्न आहे. रायबरेलीचं नाव घेताच डोळ्यांपुढे येत ते गांधी घराणं. इंदिरा गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा मतदारसंघ. गांधी घराण्याचा बालेकिल्ला. देशात व्हीव्हीआयपी मतदारसंघाचा मान…देशातील सर्वात शक्तिशाली राजकीय कुटुंबाची कर्मभूमि. (Raebareli LS Constituency)

लोकसभा निवडणुकीचा बॅनर

एवढं सगळं वलय असूनही रायबरेलीच्या नशिबात वारणासी, लखनौ, सैफई, प्रयागराजसारखा विकास का नाही झाला? गांधी कुटुंबाने रायबरेलीची एवढी उपेक्षा का केली? गांधी कुटुंबाला लोकसभेत कितीतरी वेळा पाठविलं. पण गांधी कुटुंबानं रायबरेलीकडे दुर्लक्ष का केले? हा प्रश्न आता रायबरेलीवासीयांना पडला आहे. (Raebareli LS Constituency)

विकासाला ती गती मिळाली नाही

गांधी कुटुंबातील सदस्यांनी रायबरेलीमधून अनेकवेळा निवडणूक लढली. यामुळे या मतदारसंघाला व्हीआयपी सीटचा दर्जा निश्चितच मिळाला. पण विकासाचा जो वेग हवा होता तो मिळाला नाही. अनेक मोठे प्रकल्प मंजूर झाले पण जमिनीवर उतरू शकले नाहीत. कनेक्टिव्हिटी सुधारली परंतु शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात अजूनही खूप मागे आहे. काँग्रेसच्या निष्ठेच्या बदल्यात जिल्ह्याला काय मिळाले? असा प्रश्न जनता या निवडणुकीत विचारू लागली आहे. (Raebareli LS Constituency)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : एसटी बस प्रवाशांसाठी की निवडणूक कामांसाठी ?)

भाजपा सरकारमध्ये रस्ते सुधारले

रायबरेलीचा जसा विकास काँग्रेस सरकारच्या काळात व्हायला हवा होता, तो झाला नाही. जनतेला मूलभूत समस्यांसाठी सुध्दा संघर्ष करावा लागत आहे. रायबरेलीने अनेकवेळा गांधी कुटुंबाला निवडून दिले. आपली निष्ठा कायम ठेवली. पण बदल्यात काय मिळाले? हा प्रश्न निर्माण झाला आहे. याउलट भाजपा सरकारमध्ये रस्ते सुधारले, आयटीआय शाळा सुरू झाल्या. शेतकऱ्यांना सन्मान निधी आणि गरिबांना मोफत रेशन मिळू लागले आहे. (Raebareli LS Constituency)

भाजपा सरकारने नापीक जमीन सुपीक करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात कालव्यांचे जाळे उभारले. त्यामुळे शेतकरी उत्तम शेती करून स्वावलंबी होत आहेत. भाजपा सरकारने गोरक्षणासाठी ८२ गोशाळा बांधल्या. गुरांना चारा व पाणी वेळेवर मिळावे यासाठी सीसी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. भाजपाचे सरकार नसते तर रामाचे मंदिर बनले नसते. (Raebareli LS Constituency)

कनेक्टिव्हिटी : कितीतरी वर्षे उलटली आहे पण चौपदरी महामार्गाचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. लखनौ-प्रयागराज दरम्यानची वाढती वाहतूक पाहता २०१६ साली रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संगम नगरी ते रायबरेली यांना जोडणारा रायबरेली प्रयागराज महामार्ग चौपदरी करण्याची घोषणा केली होती. रायबरेली ते प्रयागराज हे अंतर १२० किमी आहे. तीन फेज रस्ता रुंदीकरण (चार पदरी) करण्यासाठी केंद्र सरकारने २६३६ कोटी रुपये मंजूर केले होते. (Raebareli LS Constituency)

(हेही वाचा – Article 370 : आजोबांचे स्वप्न साकार! नातू विचारतो, काय साध्य केलं?)

गेल्या ४० वर्षांपासून शिक्षणाची पातळी तशीच

लखनौ ते प्रयागराज दरम्यानच्या या व्हीव्हीआयपी जिल्ह्यात शिक्षणाचा स्तर होता तसाच राहिला आहे. काही गोष्टी बाजूला ठेवल्या तर येथे उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षणासाठी नवीन संस्था स्थापन होऊ शकल्या नाहीत. यामुळेच विद्यार्थ्यांना लखनौ किंवा प्रयागराजला जावे लागते. १९८४ मध्ये उच्च शिक्षणासाठी तीन महाविद्यालये होती. मात्र ४० वर्षांनंतरही पारंपरिक शिक्षण संस्था बाजूला ठेवल्या तर तंत्रशिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण संस्थांची वानवा आहे. (Raebareli LS Constituency)

आरोग्य सेवा वेदनेने हाहाकार माजवत आहेत

एम्स येथे कार्यरत आहे. परंतु सर्दी-खोकल्यासाठी रुग्ण केवळ सीएचसी, पीएचसी आणि जिल्हा रुग्णालयात जातात. आजार वाढले, रुग्ण वाढले, पण जिल्हा रुग्णालयापासून सीएचसी, पीएचसीपर्यंत कर्मचारी वाढले नाहीत. जवळपास चार दशकांपूर्वी जी परिस्थिती होती ती आजही कायम आहे. जिल्ह्याची लोकसंख्या अंदाजे ३४ लाख आहे. (Raebareli LS Constituency)

एका डॉक्टरवर दीडशे रुग्णांचा भार

एम्स वगळून खासगी रुग्णालयांसह जिल्हयात दररोज सरासरी १५ हजार रुग्ण आरोग्य सेवा घेत आहेत. केवळ सरकारी आरोग्य साधनांचा आढावा घेतला तर एका डॉक्टरवर दररोज दीडशे रुग्णांचा भार आहे. तर डॉक्टरांच्या मते एका दिवसात एक डॉक्टर सरासरी ५० रुग्णांना सेवा देऊ शकतो. मात्र, रायबरेलीत खूप मोठा भार आहे. (Raebareli LS Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.