Lok Sabha Election : लोकसभेच्या निवडणुकीवर डीपफेकचे संकट!

नेते, पक्ष आणि मतदारांसमोर मोठे आव्हान

243
Lok Sabha Election : लोकसभेच्या निवडणुकीवर डीपफेकचे संकट!

निवडणुकीच्या काळात मतदारांची दिशाभूल करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवणे ही आधीच मोठी समस्या होती. आता यात भर पडली आहे ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. राजकीय नेत्यांचे फोटो, व्हिडिओ किंवा आवाजाची हुबेहुब नक्कल करून मतदारांची दिशाभूल करणारे मॅसेज पसरविण्याचा प्रयत्न या निवडणुकीत प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आणि हीच खरी चिंतेची बाब आहे. (Lok Sabha Election)

१८व्या लोकसभेची निवडणूक आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकीपेक्षा फार वेगळी आहे. मतदारांना प्रभावित किंवा दिशाभूल करून त्यांची मते मिळविण्यासाठी खोटी माहिती या निवडणुकीच्या प्रचारात पसरविली जाण्याची दाट शक्यता आहे. यामुळे निवडणूक आयोगापासून ते मतदारांपर्यंत आणि राजकीय नेत्यांपासून ते कायदेतज्ज्ञांच्या मनात खूप मोठी भीती निर्माण झाली आहे. (Lok Sabha Election)

(हेही वाचा – JCB Pattern : नेत्यांच्या स्वागताचा “जेसीबी पॅटर्न”)

आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात डीपफेक हे एक तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून कुणीही एखाद्याच्या फोटो किंवा व्हिडिओमध्ये बदल करून नवीन फोटो किंवा व्हिडीओ बनवू शकतो. हे तंत्रज्ञान एवढे प्रभावी आहे की फोटो किंवा व्हिडीओ नकली आहे याची पुसटशी शंकासुध्दा कुणाला येत नाही. असे वाटते जणू तो नेताच बोलत आहे. परंतु हे सत्य नसते. या निवडणुकीत डीपफेक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होण्याची शक्यता आहे. यामुळे लोकसभा निवडणूक ही खूप मोठ्या संकटाच्या सावटाखाली सापडली आहे असे म्हणावे लागेल. (Lok Sabha Election)

डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून सध्या हयात नसलेल्या नेत्यांचे व्हिडिओही बनवले जात आहेत. अलीकडेच द्रमुक पक्षाचे दिवंगत नेते एम करुणानिधी यांचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला होता. ते टी. आर. बाळू यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करताना या व्हिडीओत दिसत आहेत. जेव्हा की २०१८ मध्येच करुणानिधी यांचे निधन झाले. (Lok Sabha Election)

राजकीय पक्षांना मिळाले नवे अस्त्र!

निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्ष सातत्याने सभा घेत आहेत. आता त्याला नवीन तंत्रज्ञानाची सोबत मिळाली आहे. हे आहे- कृत्रिम बुद्धिमत्ता (AI). फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राजकीय पक्ष एआयच्या मदतीने बनवलेले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत. पक्षाच्या उमेदवारांची स्तुती करणे, विरोधकांची खिल्ली उडवणे किंवा मतदारांना थेट संदेश देणे यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. (Lok Sabha Election)

भाजपा आणि काँग्रेससह जवळजवळ प्रत्येक राजकीय पक्षाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) द्वारे तयार केलेले फोटो किंवा व्हिडिओ शेअर केले आहेत. या बदललेल्या फोटोंना किंवा व्हिडिओला बोलचालीत ‘डीपफेक’ म्हणतात. (Lok Sabha Election)

एआयच्या मदतीने कोणत्याही नेत्याच्या आवाजाची अचूक कॉपी करता येते. अशा परिस्थितीत नेता निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी व्हॉइस क्लोनिंग टूलचा वापर करू शकतो. आत्तापर्यंत निवडणुकीच्या काळात रेकॉर्डेड मेसेज असलेले फोन यायचे ज्यात कुठला तरी नेता मते मागायचा. हे सर्वज्ञात आहे. पण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने तुम्हाला कॉलच्या सुरुवातीला थेट नावाने संबोधित केले जाऊ शकते. यामुळे निवडणूक प्रचार अधिक वैयक्तिक होऊ शकतो. (Lok Sabha Election)

(हेही वाचा – Maharashtra Cricket Association Stadium : गहुंजेतील ‘स्टेट ऑफ द आर्ट’ क्रिकेट स्टेडिअममध्ये आणखी काय सुविधा आहेत?)

२०१४ पासून डीपफेकचा वापर केला जात आहे

२०१४ पासून डीपफेकचा वापर केला जात आहे. २०१२ मध्येच भाजपाने नरेंद्र मोदींचा थ्रीडी होलोग्राम फोटो वापरला होता. या तंत्राने पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रचार करत असल्याचा भास होत होता. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीतही हेच तंत्र मोठ्या प्रमाणावर वापरले गेले. (Lok Sabha Election)

डीपफेकचे निवडणूक आयोगासमोर आव्हान

मात्र, या निवडणुकीत मतदारांची दिशाभूल करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर मोठया प्रमाणावर होणार असल्याची भीती वर्तविली जात आहे. डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या फेक न्यूज ओळखणे खूप कठीण आहे. डीपफेक तंत्रज्ञानाचा सामना करण्यासाठी आयोगाकडे पुरेशी संसाधने नाहीत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भंग होणार नाही याची काळजी निवडणूक आयोगाला घ्यावी लागणार आहे. (Lok Sabha Election)

यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हजारो संवेदनशील मतदान केंद्रांवर अनियमितता शोधण्यासाठी एआय टूल्सचा वापर आयोगाकडून केला जाणार आहे. मतदान केंद्रावर मतदान अधिकाऱ्यांची अनुपस्थिती किंवा मर्यादेपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती यासारखी कोणतीही अनियमितता आढळल्यास हे एआय टूल्स तत्काळ निवडणूक आयोगाला रिपोर्ट करणार आहे. (Lok Sabha Election)

(हेही वाचा – Himachal Operation Lotus : काँग्रेसचे ६ बंडखोर आणि ३ अपक्ष आमदारांचा भाजपामध्ये प्रवेश)

२०२४ च्या निवडणुकांसाठी META कशी तयार आहे?

फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपची मूळ कंपनी मेटा सुध्दा सतर्क झाली आहे. आपल्या प्लॅटफॉर्मवरून निवडणुकीशी संबंधित कोणतीही चुकीची माहिती पसरणार नाही याची खास खबरदारी मेटाकडून घेतली जात आहे. यासाठी जगभरात ४०,००० कर्मचारी कार्यरत आहेत. (Lok Sabha Election)

भारतात यासाठी कायदा नाही

एआय किंवा डीपफेक तंत्रज्ञान वापरणाऱ्यांना आणि ते तयार करणाऱ्यांना शिक्षा देईल असा कोणताही कायदा सध्या आपल्या देशात अस्तित्वात नाही. सध्या भारताच्या सार्वभौमत्वाला, एकात्मतेला किंवा अखंडतेला धोका निर्माण होईल अशा खोट्या बातम्या पसरविणाऱ्यावर कारवाई करणारा कायदा आहे. पण डीपफेकसाठी कायदा नाही. (Lok Sabha Election)

सोबतच, चुकीची माहिती पसरवल्याच्या किंवा एखाद्याची बदनामी केल्याच्या आरोपावरून भारतीय दंड संहिता १८६०, नवीन कायदा भारतीय न्याय संहिता २०२३, माहिती तंत्रज्ञान कायदा २००० किंवा IT नियम २०२१ अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. डीपफेक ही मोठी समस्या बनू शकते. त्यामुळे सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक पोस्टवर लगेच विश्वास ठेवू नये हे महत्त्वाचे आहे. (Lok Sabha Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.