Lok Sabha Election 2024 : काँग्रेस-माकपातील भांडणाला जनता कंटाळली; केरळात भाजपाला संधी

काँग्रेस आणि माकपा हे दोन्ही पक्ष मुस्लिम आणि ख्रिश्चनबहुल केरळला भाजपापासून मोठा धोका असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.

168
Lok Sabha Elections 2024 : नवीन लोकसभेतील ५४३ पैकी ५०३ खासदार कोट्यधीश
  • वंदना बर्वे

कॉंग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकपा) मतदारांची कशी दिशाभूल करते? हे बघायचं असेल तर फक्त एकदा केरळमधील राजकीय घडामोडींकडे बघण्याची गरज आहे. कॉंग्रेस आणि माकपा हे दोन्ही पक्ष देशातील चार राज्यांमध्ये आघाडी करून लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. परंतु, केरळमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. राज्यातील सत्ता आपल्यापैकी कुण्यातरी एकाच पक्षाच्या हातात असावी अशी रणनीती दोन्ही पक्षांनी आखली असली तरी ही बाब केरळवासीयांच्या लक्षात आली आहे. यामुळे, कॉंग्रेस आणि माकपाच्या कृत्रिम भांडणाला कंटाळललेली केरळची जनता आता तिसरा पर्याय म्हणून भारतीय जनता पक्षाकडे बघत आहे. (Lok Sabha Election 2024)

केरळची जनता कॉंग्रेस-माकपाच्या नाटकाला कंटाळली आहे ही बाब भाजपाच्या लक्षात आली असून केंद्रातील सत्ताधारी पक्षाने केरळसाठी खास रणनिती आखली आहे. भाजपाने केंद्रीय आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर आणि ए.के. अंटोनी यांच्या मुलाला तिकीट देऊन कॉंग्रेस-माकपाच्या गडाला भगदाड पाडण्याचा डाव खेळला आहे. केरळमधील लोकसभेच्या सर्व २० जागांसाठी उद्या, शुक्रवार दि. २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. केरळचा किल्ला फत्ते करण्यासाठी कॉंग्रेस आणि माकपा आमनेसामने आहे. मागील निकालाची पुनरावृत्ती करण्यासाठी कॉंग्रेस उताविळ आहे तर माकपानेसुध्दा कॉंग्रेसला धडा शिकविण्याचे ठरविले आहे. (Lok Sabha Election 2024)

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित आघाडीला १९ जागांवर विजय मिळाला होता. यातील १५ जागांवर तर कॉंग्रेस विजयी झाली होती. हे खरे असले तरी केरळमध्ये मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या नेतृत्वात माकपाचे सरकार आहे. केरळमधून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी कॉंग्रेस आणि माकपा यांच्यात चुरशीत लढत होणे आहे. राहुल गांधी यांनी केरळमध्ये प्रचंड मोठे घोटाळे झाले असल्याचा आरोप करीत केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशीची मागणी केली आहे. सीबीआय किंवा अन्य केंद्रीय संस्था केरळ सरकारची चौकशी करण्यास टाळाटाळ करीत आहेत. कारण, माकपाने भाजपासोबत हातमिळवणी केली आहे, असा कॉंग्रेसचा आरोप आहे. याउलट, मुख्यमंत्री विजयन यांनी आणीबाणीच्या काळात झालेल्या अटकेचे कारण देत गांधी कुटुंबावर हल्ला चढवला आहे. (Lok Sabha Election 2024)

महत्वाचे सांगायचे म्हणजे, तामिळनाडू, त्रिपुरा, बिहार यांसारख्या राज्यांमध्ये कॉंग्रेस आणि माकपा आघाडी करून निवडणुकीचा सामना करीत आहे. मात्र, केरळमध्ये याच दोन्ही पक्षांमध्ये काट्याची स्पर्धा आहे. केरळ हे एकमेव राज्य उरले आहे जिथे सीपीआय(एम) आणि काँग्रेस दोन्ही मजबूत स्थितीत आहेत. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : ‘ओवेसींसारख्या नेत्याची तोंडं बंद व्हायला हवी’, माधवी लता कडाडल्या)

केरळ सीपीआय(एम) चा एकमेव बालेकिल्ला

२०१९ मध्ये एकट्या काँग्रेसने १५ जागा जिंकल्या होत्या. कॉंग्रेससाठी केरळ हे एकमेव असे राज्य होय जेथे सर्वात जास्त जागा जिंकल्या होत्या. बंगाल आणि त्रिपुराची सत्ता गमाविल्यानंतर केरळ हा माकपाचा उरलेला एकमेव बालेकिल्ला होय. माकपाने येथे सलग दोनदा विधानसभा निवडणुका जिंकून सत्तेत आहे. (Lok Sabha Election 2024)

सीपीआय(एम) ने दिग्गजांना मैदानात उतरवले

केरळमध्ये माकपासाठी भारतीय राजकारणातील अस्तित्वाचा लढा आहे. त्यामुळेच यावेळी माकपाने आपल्या दिग्गज नेत्यांना उमेदवारी दिली आहे. माकपाने माजी सचिव पन्नयन रवींद्रन यांना काँग्रेस नेते शशी थरूर आणि दोन वेळा अर्थमंत्री थॉमस आयझॅक यांना ए. के. अँटनी यांच्या विरोधात उभे केले आहे. (Lok Sabha Election 2024)

सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा यांच्या पत्नी ॲनी राजा या वायनाडमधून राहुल गांधींच्या विरोधात उतरल्या आहेत. कोरोनाच्या काळात आपल्या उत्कृष्ट कामामुळे देशभरात प्रसिद्ध झालेल्या माजी आरोग्य मंत्री केके शैलजा वडकारा येथून निवडणूक लढवत आहेत. शैलजा, ज्यांना त्यांच्या परिसरात “शिक्षक अम्मा” म्हणून ओळखले जाते, त्यांच्याकडे प्रबळ उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. (Lok Sabha Election 2024)

दुसरीकडे, सलग तीन वेळा विजयी झालेले काँग्रेसचे चार उमेदवार चौथ्यांदा रिंगणात आहेत. यामध्ये तिरुवनंतपुरममधील शशी थरूर, पथनामथिट्टा येथील ए.के. अँटोनी, मावेविक्कारा येथील कोडिकुनिल सुरेश आणि कोझिकोडमधील एमके राघवन यांचा समावेश आहे. या उमेदवारांनी निवडणूक प्रचारात केलेल्या कामावर माकप आणि भाजप दोघेही प्रश्न उपस्थित करत आहेत. (Lok Sabha Election 2024)

काँग्रेस आणि माकपा हे दोन्ही पक्ष मुस्लिम आणि ख्रिश्चनबहुल केरळला भाजपापासून मोठा धोका असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी यांनी आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल आणि झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) प्रमुख हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली. परंतु, ईडीने विजयन यांच्यावर कारवाई केली नाही. माकपा आणि भाजपामध्ये हात मिळवणी झाली असल्याचा हाच सर्वात मोठा पुरावा असल्याचा आरोपही कॉंग्रेस करीत आहे. माकपाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनीसुध्दा काँग्रेसचे खासदार, आमदार आणि ज्येष्ठ नेते भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचे नमूद करीत राहुल गांधी यांच्यावर शरसंधान साधले आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.