Lok Sabha Election : मिहीर कोटेचा यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त घेतली मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट

118

मुलुंडचे आमदार आणि मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील (Lok Sabha Election) भाजपा-महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त बुधवार, 1 मे रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि निवडणुकीसाठी पाठिंबा आणि मार्गदर्शन घेतले.

mihir

आपण महाराष्ट्र दिनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्याकडून पाठिंबा आणि मार्गदर्शन घेण्यासाठी आलो होतो. यावेळी अमित ठाकरे यांचीही भेट घेतली. मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याने आम्हाला ऊर्जा मिळाली आहे आणि आम्हाला खात्री आहे की, मतदार आम्हाला निवडणुकीत आशीर्वाद देतील, असे कोटेचा म्हणाले. (Lok Sabha Election)

(हेही वाचा Lok Sabha Election : शिरूर लोकसभा मतदारसंघात कोण असेल लोकांची पसंती, ‘संसदरत्न खासदार’ की ‘दांडगा जनसंपर्क असलेला खासदार’ ?)

मनसे प्रमुख उत्तर पूर्व मुंबईत प्रचार करणार की नाही, यावर कोटेचा म्हणाले, याबाबतचा निर्णय मनसे प्रमुख राज ठाकरे घेतील. गेल्या काही दिवसांत मनसेच्या नेत्यांनी पक्षाचा लक्षणीय प्रभाव असलेल्या भांडुप आणि विक्रोळी या भागात प्रभाग आणि बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांच्या सभा घेतल्या. मनसे प्रमुखांनी राज्यातील महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्यानंतर या बैठका झाल्या. भाजपाचे उमेदवार मिहीर कोटेचा यांना मोठ्या फरकाने विजय मिळवून देण्यासाठी मनसेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. बुधवारी सकाळी कोटेचा यांनीही महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.