Lok Sabha Election Phase 1: लोकसभेच्या पहिल्या टप्प्याच मतदान सुरू, पंतप्रधान मोदींकडून खास मराठीत देशवासीयांना आवाहन

174
Lok Sabha Election Phase 1: लोकसभेच्या पहिल्या टप्प्याच मतदान सुरू, पंतप्रधान मोदींकडून खास मराठीत देशवासीयांना आवाहन
Lok Sabha Election Phase 1: लोकसभेच्या पहिल्या टप्प्याच मतदान सुरू, पंतप्रधान मोदींकडून खास मराठीत देशवासीयांना आवाहन

देशभर मतदानाला (Lok Sabha Election Phase 1) सुरुवात झाली असून मतदारांना प्रोत्साहन देण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सहा भाषांमधून देशवासीयांना आवाहन केलं आहे. विशेषतः तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांना विक्रमी संख्येनं मतदान करावं, असे पंतप्रधानांनी (Prime Minister Narendra Modi) म्हटले आहे. (Lok Sabha Election Phase 1)

पूर्व विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला

सर्व ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. पूर्व विदर्भात नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया या पाच मतदारसंघाचा समावेश होतो. (Lok Sabha Election Phase 1) पूर्व विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २०१९ च्या निवडणुकीत पाच पैकी चार जागा भाजप-सेना युतीने तर एका जागा काँग्रेसने जिंकली होती. २०२४ मध्ये चित्र वेगळे आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनंगटीवार हे रिंगणात आहेत. (Lok Sabha Election Phase 1)

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

पंतप्रधान मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आपल्या X अकाऊंटवरुन म्हटले आहे की, ‘2024 च्या लोकसभा निवडणुकीला आजपासून सुरुवात! 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांसाठी मतदान होत असल्याने, या जागांसाठी मतदान करणाऱ्या सर्वांनी विक्रमी संख्येनं मतदान करावं असं मी आवाहन करतो. विशेषतः तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं मी आवाहन करतो. शेवटी, प्रत्येक मत मोजले जाते आणि प्रत्येक आवाज महत्त्वाचा असतो!’ (Lok Sabha Election Phase 1)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.