Lok Sabha Election Phase 7 मतदान सुरू! शेवटच्या टप्प्यात होणार चुरशीच्या लढती

138
Lok Sabha Election Phase 7 मतदान सुरू! शेवटच्या टप्प्यात होणार चुरशीच्या लढती
Lok Sabha Election Phase 7 मतदान सुरू! शेवटच्या टप्प्यात होणार चुरशीच्या लढती

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात (Lok Sabha Election Phase 7) आज (१ जून) ७ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या एकूण 57 जागांसाठी मतदान होत आहे. या टप्प्यात वाराणसी लोकसभा मतदारसंघातही मतदान होणार आहे जिथून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. शेवटच्या टप्पयात मतदार नेमकी कुणाला पसंती देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. (Lok Sabha Election Phase 7)

(हेही वाचा –दरवर्षी का साजरा केला जातो World Milk Day?)

सातव्या टप्प्यात (Lok Sabha Election Phase 7) केंद्रशासित प्रदेश चंदीगड, पंजाबमधील सर्व 13 लोकसभा, हिमाचल प्रदेशातील 4, उत्तर प्रदेशातील 13, पश्चिम बंगालमधील 9, बिहारमधील 8, ओडिशातील 6 आणि झारखंडमधील 3 लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. ओडिशाच्या उर्वरित 42 विधानसभा जागांसाठी आणि हिमाचल प्रदेशच्या सहा विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकाही एकाच वेळी होणार आहेत. सातव्या टप्प्यात जवळपास 5.24 कोटी पुरुष, 4.82 कोटी महिला आणि 3574 हजार तृतीयपंथीसह एकुण 10.06 कोटी लोक आज मतदान करण्यासाठी पात्र आहेत. (Lok Sabha Election Phase 7)

(हेही वाचा –Local Railway Jumbo Block: ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारने सांगितली पर्यायी वाहतूक व्यवस्था!  )

पंतप्रधान नरेंद्र मोदी, दोन केंद्रीय मंत्री राजकुमार सिंग आणि अनुराग ठाकूर रिंगणात आहेत. या टप्प्यात चार कलाकार रिंगणात आहेत, ज्यामध्ये कंगना रणौत, रवी किशन, पवन सिंह, काजल निषाद हे देखील निवडणूक लढवत आहेत. (Lok Sabha Election Phase 7)

आतापर्यंत किती टक्के मतदान?

पहिल्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी ६६.१४ टक्के, दुसऱ्या टप्प्यात ६६.७१ टक्के, तिसऱ्या टप्प्यात ६५.६८ टक्के, चौथ्या टप्प्यात ६९.१६ टक्के, पाचव्या टप्प्यात ६२.२ टक्के, सहाव्या टप्प्यात ६३.३६ टक्के इतकं मतदान झालं आहे. (Lok Sabha Election Phase 7)

शेवटच्या टप्प्यातील चुरशीच्या लढती

शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी, लालू प्रसाद यांची कन्या मीसा भारती, अभिनेत्री कंगना राणौत, रवी किशन, निशिकांत दुबे या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (Lok Sabha Election Phase 7)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.