Lok Sabha Election Result 2024: जळगावमध्ये भाजपाने गड राखला! स्मिता वाघ विजयी

187
Lok Sabha Election Result 2024: जळगावमध्ये भाजपाने गड राखला! स्मिता वाघ विजयी

राज्यासह देशभरात सकाळ पासून मत मोजणालीला सुरुवात झाली आहे. मतमोजणी दरम्यान विविध घडामोडी घडत असल्यातरी मागील मागील २० वर्षापासून भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या जळगाव जिल्ह्यात भाजपा उमेदवार निवडून आले तर विरोधी पक्षातील उबाठा गटाच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला आहे.  (Lok Sabha Election Result 2024)

जळगाव लोकसभा (Jalgaon Lok Sabha) निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं. या मतदारसंघात भाजपाने आपला गड राखला असून महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ (BJP Smita Wagh) या विजयी झाल्या आहे. महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे करण पवार (UBT Kiran Pawar) यांना उमेदवारी दिली होती. अखेर या मतदारसंघात भाजपने आपला गड राखला असून महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ या दीड लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आलेल्या असून शहरातील भाजप कार्यालयात महिला कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून एकच जल्लोष केला आहे. (Lok Sabha Election Result 2024)

जळगाव लोकसभा मतदारसंघातील मतदानाची विधानसभानिहाय टक्केवारी

जळगाव लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या तुलनेत मतदान वाढले आहे. यंदा जळगावमध्ये सरासरी ५७.७० टक्के मतदान झाले. १९ लाख ९४ हजार ०४६ मतदारांपैकी ११ लाख ५० हजार ५३६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ५६.११ टक्के इतकी होती. यंदाच्या निवडणुकीत वाढलेल्या मतदानाचा टक्का स्मिता वाघ आणि करण पवार यांच्यापैकी कोणासाठी फायदेशीर ठरणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

जळगाव शहर – 52.90 टक्के

जळगाव ग्रामीण – 62.60 टक्के

अमळनेर – 55.94 टक्के

एरंडोल – 61.76 टक्के

चाळीसगाव – 55.01 टक्के

पाचोरा – 59.82 टक्के

जळगाव लोकसभा मदरसंघातील आमदार 

जळगाव शहर – सुरेश पाटील (भाजप)

पाचोरा – किशोर पाटील (शिवसेना शिंदे गट)

चाळीसगाव  – मंगेश चव्हाण (भाजप) 

अमळनेर – अनिल पाटील (राष्ट्रवादी अजित पवार गट) 

जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील (शिवसेना शिंदे गट)

एरंडोल – चिमणराव पाटील (शिवसेना शिंदे गट)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.