Lok Sabha Election Result 2024: मुंबईत ६ जागांवर कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

231
Lok Sabha Election Result 2024: मुंबईत ६ जागांवर कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?
Lok Sabha Election Result 2024: मुंबईत ६ जागांवर कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

उत्तर मध्य मुंबईतून (Lok Sabha Election Result 2024) भाजपाचे उज्वल निकम हे 23 हजार मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यासाठी हा धक्का आहे. उत्तर मुंबईतून भाजपाचे उमेदवार पीयूष गोयल हे 49 हजार मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसचे भूषण पाटील हे पिछाडीवर आहेत. (Lok Sabha Election Result 2024)

(हेही वाचा –Lok Sabha Election Result 2024: रत्नागिरी-सिंधुदुर्गात कांटे की टक्कर!)

उत्तर पूर्व मुंबई म्हणजे ईशान्य मुंबईतून (Mumbai) ठाकरे गटाचे संजय दीना पाटील हे 18 हजार मतांनी आघाडीवर आहेत. भाजपाचे मिहिर कोटेचा पिछाडीवर आहेत. दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे अरविंद सावंत 6 हजार मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव पिछाडीवर आहेत. (Lok Sabha Election Result 2024)

(हेही वाचा –Lok Sabha Election Live Update: पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पिछाडीवर)

दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाचे अनिल देसाई 10 हजार मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे पिछाडीवर आहेत. उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर 5 हजार मतांनी आघाडीवर आहेत. ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर पिछाडीवर आहेत. (Lok Sabha Election Result 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.