Lok Sabha Election Result 2024: मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात उज्वल निकम २२८५९ मतांनी आघाडीवर, तर वर्षा गायकवाड पिछाडीवर

191
Lok Sabha Election Result 2024: मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात उज्वल निकम २२८५९ मतांनी आघाडीवर, तर वर्षा गायकवाड पिछाडीवर
Lok Sabha Election Result 2024: मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात उज्वल निकम २२८५९ मतांनी आघाडीवर, तर वर्षा गायकवाड पिछाडीवर

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात उज्वल निकम (Ujwal Nikam) २२८५९ मतांनी आघाडीवर, तर वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) 19203 मतांनी पिछाडीवर आहेत. दक्षिण मध्य मुंबईत (Lok Sabha Election Result 2024) शिंदेंचे उमेदवार राहुल शेवाळे विरुद्ध ठाकरेंचे अनिल देसाई (Anil Desai) यांच्याविरोधात हायव्होल्टेज सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासून राहुल शेवाळेंनी आघाडी कायम होती. मात्र आता राहुल शेवाळे पिछाडीवर आहेत. (Lok Sabha Election Result 2024)

(हेही वाचा –Lok Sabha Election Result 2024: तासाभरातच एनडीएचं द्विशतक पार; अटीतटीच्या लढतीत कोण वरचढ?)

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात उज्वल निकम 2 हजार 697 मतांनी आघाडीवर आहेत. (Lok Sabha Election Result 2024)ठाणे लोकसभा मतदार संघातून शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) आघाडीवर, तर उबाठा गटाचे उमेदवार राजन विचारे पिछाडीवर आहेत. 4072 मतांनी नरेश म्हस्के आघाडीवर आहेत. (Lok Sabha Election Result 2024)

(हेही वाचा –Lok Sabha Election Result 2024: मतमोजणीला सुरूवात होण्या अगोदरच हिंगोलीत मशीनमध्ये बिघाड!)

मुंबईतील आतापर्यंतच्या कलांमध्ये ठाकरेंच्या शिलेदारांचाच डंका पाहायला मिळत आहे. आतापर्यंत दक्षिण मुंबईतून अरविंद सावंतांनी, तर वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकरांनी आघाडी टिकवून ठेवली आहे. तर ईशान्य मुंबईतून मिहिर कोटेचा (Mihir Kotecha) यांना मागे टाकत संजय दीना पाटील यांनी आघाडी घेतली आहे. सध्या तरी मुंबईत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात संभ्रमाचं वातावरण आहे. (Lok Sabha Election Result 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.