Lok Sabha Election Result 2024: कोकणात गुलाल राणेंचाच! नितेश राणेंनी आईला उचलून घेत साजरा केला जल्लोष

315
Lok Sabha Election Result 2024: कोकणात गुलाल राणेंचाच! नितेश राणेंनी आईला उचलून घेत साजरा केला जल्लोष
Lok Sabha Election Result 2024: कोकणात गुलाल राणेंचाच! नितेश राणेंनी आईला उचलून घेत साजरा केला जल्लोष

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून (Lok Sabha Election Result 2024) केंद्रीय मंत्री नारायण राणे विजयाकडे वाटचाल करताना दिसत आहेत. ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांचं राणेंसमोर आव्हान आहे. नारायण राणेंची (Narayan Rane) विजयाकडे वाटचाल होताच त्यांच्या पत्नी आणि आमदार पुत्र नितेश राणे (Nitesh Rane) यांचा विजयोत्सव पाहायला मिळाला. नितेश राणेंनी आईला उचलून घेत जल्लोष साजरा केला. (Lok Sabha Election Result 2024)

(हेही वाचा –Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रात पहिला विजय जाहीर! मुंबई उत्तरमध्ये भाजपाचे पियूष गोयल विजयी)

नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे भाजपच्या मतमोजणी कक्षाकडे जात होत्या. यावेळी गाडीतून उतरलेल्या मातोश्रींना पाहून आमदार नितेश राणेंचा आनंद पोटात मावेनासा झाला. वडिल्यांच्या विजयी आघाडीने भारावलेल्या नितेश राणेंनी आईला उचलून घेत आनंदोत्सव साजरा केला. (Lok Sabha Election Result 2024)

(हेही वाचा –Lok Sabha Election Result 2024: रायगडमध्ये कुणाचे पारडे जड? तर काय सांगते आकडेवारी? )

रत्नागिरी सिंधदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना 12 व्या फेरी नंतर 23 हजार 450 मतांची आघाडी मिळाली आहे. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. नारायण राणे यांना उमेदवारी उशिरा जाहीर झाली असली, तरी त्यांचं नाव निश्चित मानलं जात होतं. त्यामुळे त्यांनी आधीच मतदारसंघात तळ ठोकत सभा-बैठका, भेटीगाठींचा धडाका लावला होता. महाविकास आघाडीसाठी ही लढाई अस्तित्वाची, तर महायुतीसाठी ती प्रतिष्ठेची ठरली होती. (Lok Sabha Election Result 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.