Lok Sabha Election 2024 भाजपाला तिसर्यांदा बहुमताने निवडून येण्याची आशा आहे. सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजपाला पुन्हा सत्ता स्थापन करण्यात यश मिळेल का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) मतदारसंघातून नवनीत राणा (Navneet Rana) हे 117684 मतांनी आघाडीवर असून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे (Balvant Wankhede) 111944 मतांनी पिछाडीवर आहेत. तर प्रहार जन शक्तीचे उमेदवार दिनेश बूब 16271 मते मिळाली आहेत. (Lok sabha Election Result 2024)
नवनीत राणा (Navneet Rana) भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. तर महाविकासआघाडीकडून काँग्रेसचे दर्यापूर विधानसभेचे विद्यमान आमदार बळवंत वानखडे (Balwant Wankhede) मैदानात उतरले. आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध करत प्रहार कडून दिनेश बुब (Dinesh Bub) यांना मैदानात उतरवत तिरंगी लढत केली.
(हेही वाचा – Lok Sabha Election Result 2024: रत्नागिरी-सिंधुदुर्गात कांटे की टक्कर!)
अमरावतीच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागलेय. 2019 च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजय मिळवला होता. पण त्यानंतर त्यांनी भाजपसोबत युती करत महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काय होणार ? याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागलेय. (Lok sabha Election Result 2024)
कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदान? (Amravati Lok Sabha Voting Percentage 2024)
यंदा अमरावती लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी 63.67 टक्के मतदान झाले.
बडनेरा – 55.78 टक्के
अमरावती – 57.52 टक्के
तिवसा – 64.14 टक्के
दर्यापूर – 66.88 टक्के
मेळघाट – 71.55 टक्के
अचलपूर – 68.84 टक्के
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community