Lok Sabha Election Result 2024: तासाभरातच एनडीएचं द्विशतक पार; अटीतटीच्या लढतीत कोण वरचढ?

184
Lok Sabha Election Result 2024: तासाभरातच एनडीएचं द्विशतक पार; अटीतटीच्या लढतीत कोण वरचढ?
Lok Sabha Election Result 2024: तासाभरातच एनडीएचं द्विशतक पार; अटीतटीच्या लढतीत कोण वरचढ?

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला (Lok Sabha Election Result 2024) सुरूवात झाली असून प्रारंभिक कल समोर येत आहेत. यामध्ये पहिल्या तासातच एनडीएने मोठी आघाडी घेतल्याचे दिसत आहे. एनडीए (NDA) २७० जागांवर आघाडीवर आहे. तर, इंडि आघाडी २०२ जागांवर आघाडीवर आहे. मात्र हे प्रारंभिक कल असून हे प्रत्येक तासात बदलू शकतात. (Lok Sabha Election Result 2024)

(हेही वाचा –Lok Sabha Election 2024: निवडणूक निकालामुळे मुंबईतील वाहतूक मार्गात बदल, कोणत्या पर्यायी मार्गांचा वापर कराल?)

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं ३०३ जागा जिंकल्या होत्या. २०१४ च्या तुलनेत भाजपच्या जागा वाढल्या. भाजपनं पहिल्यांदाच ३०० चा टप्पा ओलांडला. विशेष म्हणजे यातील १६२ जागा भाजपनं २ लाखांपेक्षा जास्त मताधिक्क्यानं जिंकल्या होत्या. त्यामुळे या जागा भाजपसाठी सुरक्षित आहेत. या जागांवर भाजपचा पराभव करणं विरोधकांना अवघड आहे. कारण २ लाखांचं लीड तोडणं आव्हानात्मक आहे. भाजपाने एनडीएसह ४०० पारचा नारा दिला आहे. तर दुसरीकडे एकाही एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी न होणाऱ्या काँग्रेसने (Congress) २९५ + जागा मिळतील असा दावा केला आहे. (Lok Sabha Election Result 2024)

राहुल गांधी, अमित शाह आघाडीवर

गांधीनगरमधून अमित शाह (Amit Shah), रायबरेलीतून राहुल गांधी (Rahul Gandhi) आघाडीवर आहेत. तसंच, अमेठी लोकसभा मतदारसंघातून स्मृती इराणी मागे आहेत. अभिनेत्री कंगना रणौत ही मंडी लोकसभा मतदारसंघातून पिछाडीवर आहे. तर, वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पिछाडीवर आहेत. (Lok Sabha Election Result 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.