Lok Sabha Election Result 2024: नागपूरमध्ये नितीन गडकरींच्या विजयाची हॅट्रीक होणार?

117
Lok Sabha Election Result 2024: नागपूरमध्ये नितीन गडकरींच्या विजयाची हॅट्रीक होणार?
Lok Sabha Election Result 2024: नागपूरमध्ये नितीन गडकरींच्या विजयाची हॅट्रीक होणार?

नागपूरमध्ये नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना १ लाख १६ हजार ६०० मते मिळाली आहेत. तर विकास ठाकरे (Vikas Thackeray) यांना ८४ हजार २० मतं मिळाली आहेत. तिसऱ्या फेरीअखेर नितीन गडकरी ३२ हजार ५८० मतांनी आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत नितीन गडकरी ११ हजार ६७५ मतांनी आघाडीवर होते. तर, नाशिकमध्ये नवव्या फेरीअखेर मविआचे राजाभाऊ वाजे ८१, ४२५ मतांनी आघाडीवर आहेत. या मतांचा आकडा सातत्याने बदलताना दिसत आहे. (Lok Sabha Election Result 2024)

(हेही वाचा –Lok Sabha Election Result 2024: मुंबईत ६ जागांवर कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?)

पुण्यात पाचव्या फेरीअखेर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) ३५ हजार मतांनी आघाडी घेतली आहे. पाचव्या फेरीअखेर महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे २१ हजार ७८२ मतांनी आघाडीवर आहेत. (Lok Sabha Election Result 2024)पाचव्या फेरीअखेर जळगाव मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पाटील- पवार यांच्यापेक्षा 71,438 मतांनी आघाडीवर आहेत. (Lok Sabha Election Result 2024)

(हेही वाचा –Lok Sabha Election Result 2024: रत्नागिरी-सिंधुदुर्गात कांटे की टक्कर!)

तिसर्‍या फेरीअखेर (Lok Sabha Election Result 2024)रावेर मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे आघाडीवर आहेत. प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यापेक्षा 74,912 मतांनी आघाडीवर आहेत. (Lok Sabha Election Result 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.