ऐन हंगामात केलेली कांदा निर्यातबंदी भाजपाची (BJP) पाठ सोडायला तयार नसल्याचे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात दिसून आले. निर्यातबंदीच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, सत्ताधाऱ्यांकडून त्यावर कोणताही उपाय शेवटपर्यंत योजिला गेला नाही. तो राग तिसऱ्या टप्प्यापासून महाराष्ट्रात तीव्रतेने जाणवू लागला होता. माढा लोकसभा मतदारसंघापासून सुरू झालेला हा राग राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदानादरम्यान नाशिकच्या सटाण्यापासून चांदवडपर्यंत दिसून आला. (Lok Sabha Election Result 2024)
सहा ते सात लोकसभा मतदारसंघात कांदा प्रश्न भोवला
नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नगर, पुणे, सोलापूर हे कांदा उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात. धाराशिव तसेच माढा, शिरूर आणि केंद्रीय मंत्री असलेल्या डॉ. भारती पवार यांच्या दिंडोरी मतदार संघात देखील कांद्यामुळे वांदा केल्याचे चित्र समोर आले. दिंडोरी मध्ये तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सभेमध्येच शेतकऱ्यांनी कांदा प्रश्न बोलावे अशी मागणी देखील केली होती. तसेच राज्यातील या पट्ट्यातील बडे नेते छगन भुजबळ यांनी देखील कांद्याच्या मुद्द्यावरती मार्ग काढावा अन्यथा हा कांदा सर्वांचाच वांदा करणार असल्याचे भाकीत देखील केले होते. (Lok Sabha Election Result 2024)
(हेही वाचा – Yusuf Pathan : डावखुरा आक्रमक फलंदाज युसुफ पठाण आता राजकीय खेळपट्टीवर)
नाशिकमध्ये तर कांद्याच्या माळा घालून मतदानाचा प्रयत्न
नाशिक जिल्ह्यात कांदा निर्यातबंदीचा (Onion Export Ban) विषय पुन्हा तीव्रतेने पहायला मिळाला. बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण आणि संजय चव्हाण यांनी कांद्यात माळा गळ्यात घालून मतदान करत निषेध व्यक्त केला. तसेच, नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडगाव येथील काही युवक शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा घालून मतदान केंद्रावर जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना मतदान केंद्रात जाण्यास मज्जाव केला. अखेर गळ्यातल्या कांद्याच्या माळा काढल्यानंतर त्यांना मतदानासाठी केंद्रात जाण्याची परवानगी दिली. (Lok Sabha Election Result 2024)
मराठवाडा आणि विदर्भात कापूस, सोयाबीनचा फटका
मराठवाडा व विदर्भातील काही लोकसभा मतदारसंघात ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे कापूस, सोयाबीन अशा पिकांवर अवलंबून आहे. मागील तीन वर्षांत कापूस, सोयाबीनसह इतर नगदी पिकांच्या बाजारभावात मोठी घट झाली. त्यामुळे शेतकऱयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. कांदा निर्यात बंदीमुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. गुजरात आणि कर्नाटकातील कांदा निर्यात बंदी नरेंद्र मोदी सरकारने उठवली. परंतु महाराष्ट्रात निर्यातबंदी कायम ठेवल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे कांदा उत्पादक भाजपवर नाराज होता. (Lok Sabha Election Result 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community