Lok Sabha Election Result : पालघरमध्ये भाजपाचा दबदबा; भारती कामडी यांचा दारुण पराभव

243
Lok Sabha Election Result : पालघरमध्ये भाजपाचा दबदबा; भारती कामडी यांचा दारुण पराभव
Lok Sabha Election Result : पालघरमध्ये भाजपाचा दबदबा; भारती कामडी यांचा दारुण पराभव

पालघर (Palghar) मतदारसंघात (Lok Sabha Election Result 2024) महायुती, महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी या तीन प्रमुख पक्षांमध्ये मुख्य लढत पाहायला मिळाली. पालघरमध्ये भाजपचे डॉ. हेमंत सावरा (Dr. Hemant Savara) विजयी झाले आहेत. या लोकसभेसाठी (Lok Sabha Election Result 2024) दहा उमेदवार रिंगणात असून महाविकास आघाडी, महायुती आणि बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळाली. महायुतीकडून भाजपचे डॉ. हेमंत सावरा, महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून भारती कामडी आणि बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते. पालघर मध्ये महायुतीचे भाजपाचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांनी 147300 अशी निर्णायक मोठी आघाडी घेतली. (Lok Sabha Election Result 2024)

(हेही वाचा –Lok Sabha Election Result 2024: कोकणात गुलाल राणेंचाच! नितेश राणेंनी आईला उचलून घेत साजरा केला जल्लोष)

बहुजन विकास आघाडीसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. 2009 मध्ये येथे पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक झाली. तेव्हा बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव येथे खासदार झाले होते. मात्र 2014 साली ही जागा भाजपकडे गेली. त्यानंतर 2018 मध्ये या जागेवर पोटनिवडणूक झाली आणि भाजपचे राजेंद्र गावित खासदार झाले. यानंतर 2019 मध्ये संपूर्ण देशात पुन्हा एकदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. तेव्हा राजेंद्र गावित यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. आता २०२४ च्या निवडणुकीत पालघरमध्ये भाजपाने आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. (Lok Sabha Election Result 2024)

पालघर लोकसभा (Lok Sabha Election Result 2024) मतदार संघात 20 मे 2024 रोजी पार पडलेल्या निवडणुकीत एकूण मतदारांपैकी 63.91 टक्के मतदारांनी मतदान केले. या मतदारसंघात एकूण 21,48,514 मतदार असून त्यापैकी 13,73,172 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पालघर लोकसभा मतदार संघात 10,23,080 महिला मतदार आहेत. त्यापैकी 06,40,628 महिलांनी मतदान केले. तसेच 11,25,209 पुरुष मतदार असून त्यापैकी 07,32,446 मतदारांनी मतदान केले आहे. त्याचप्रमाणे 225 तृतीयपंथी मतदार असून त्यापैकी 48 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. (Lok Sabha Election Result 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.