Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रात पहिला विजय जाहीर! मुंबई उत्तरमध्ये भाजपाचे पियूष गोयल विजयी

150
Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रात पहिला विजय जाहीर! मुंबई उत्तरमध्ये भाजपाचे पियूष गोयल विजयी
Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रात पहिला विजय जाहीर! मुंबई उत्तरमध्ये भाजपाचे पियूष गोयल विजयी

उत्तर मुंबई लोकसभेचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) नुकताच जाहीर झाला असून भाजपचे पीयूष गोयल (Piyush Goyal)विजयी झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसच्या भूषण पाटील यांचे नाव घोषित करण्यात आले. मात्र, मालाड पश्चिमेपासून दहिसरपर्यंत पसरलेल्या या मतदारसंघात अनोळखी उमेदवार दिल्यामुळे काँग्रेसचे पारंपरिक मतदारही संभ्रमात पडल्याचे बोलले जात होते. (Lok Sabha Election Result 2024)

(हेही वाचा –Lok Sabha Election Result 2024: रायगडमध्ये कुणाचे पारडे जड? तर काय सांगते आकडेवारी? )

लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election Result) मतमोजणी सुरु झाल्यानंतर आता चार तास पूर्ण झालेले आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यास सुरूवात झाली आहे. अंतिम निकाल अगदी काहीच वेळात हाती येणार असून राज्यात कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे. (Lok Sabha Election Result 2024)

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक असल्याने त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.कोणाचे सरकार स्थापन होणार, हे चित्र स्पष्ट होणार आहे. लोकसभा निवडणूक निकालात देशातील काही उमेदवरांना अपेक्षित यश मिळाले आहे तर काही उमेदवारांना मोठा लीड मिळाला आहे. (Lok Sabha Election Result 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.