सुरुवातीला 6,300 मतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पिछाडीवर (Lok Sabha Election Result 2024) होते. त्यानंतर 436 मतांची मोदींनी आघाडी घेतली होती. आता पंतप्रधान मोदींनी थेट १६ हजार मतांची आघाडी घेतली आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसचे अजय राय यांच आव्हान आहे. उत्तर प्रदेशच्या वारणसीमध्ये नरेंद्र मोदी चौथ्या फेरीनंतर पुन्हा आघाडीवर आले आहेत. (Lok Sabha Election Result 2024)
उत्तर प्रदेशात अमेठीतून भाजपच्या विद्यमान खासदार स्मृती इराणी पिछाडीवर असून, काँग्रेसचे के.एल. शर्मा 10500 मतांनी आघाडीवर आहेत. तर, गुजरातच्या गांधीनगरमधून अमित शाह 2.50 लाख मतांनी आघाडीवर, तर, वाराणासीतून पंतप्रधान मोदी आघाडीवर आहेत. आतापर्यंत 500 जागांचे कल हाती आले असून, एनडीएला (NDA) 311 जागांवर आघाडी मिळाली असून, इंडि गटाकडे 21० जागांची आघाडी असल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली आणि महाराष्ट्रात एनडीए आणि इंडि आघाडीत चुरस वाढली आहे. (Lok Sabha Election Result 2024)
(हेही वाचा –Lok Sabha Election Result 2024: तासाभरातच एनडीएचं द्विशतक पार; अटीतटीच्या लढतीत कोण वरचढ?)
मुंबईत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगला होता. एक्झिट पोलसच्या अंदाजानुसार या सहाही जागांवर अटीतटीची लढत झाली असल्याने कोणालाच स्पष्ट कौल मिळालेला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष निकालानंतरच या सहा जागा कोणाच्या पारड्यात जातात हे पाहावं लागणार आहे. (Lok Sabha Election Result 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community