Lok Sabha Election Result 2024: जालोरमध्ये कॉंग्रेसला धक्का! अशोक गहलोतांच्या मुलाचा २ लाख मतांनी पराभव 

133
Lok Sabha Election Result 2024: जालोरमध्ये कॉंग्रेसला धक्का! अशोक गहलोतांच्या मुलाचा २ लाख मतांनी पराभव 

१८ व्या लोकसभा मतदानाचा निकालसत्र मंगळवारपासून सुरू आहे. यावेळी सर्वांच्या नजरा या राज्यासह इतर निवडणुकीच्या मतदानांकडे लागले आहेत. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही (NDA) आघाडीवर होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवातीपासूनच ज्या प्रकारे ४०० चा नारा देत होते. मात्र प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच दिसत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) २९२ जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडि आघाडी (Indi Allienges) २३२ जागांवर अजून तरी स्थिर आहे आहे. दरम्यान, भाजपा देशभरातील अनेक उच्चभ्रू जागांमध्ये ज्येष्ठ नेते आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा मागे पडल्याचे चित्र दिसत आहेत. (Lok Sabha Election Result 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Election Result 2024: “संविधान बदलणार म्हणून…”, निवडणुकीच्या निकालावर नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?)

दरम्यान, राजस्थानमधील जालोर लोकसभा मतदारसंघात (Jalore Lok Sabha Constituency in Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Chief Minister Ashok Gehlot) यांचे पुत्र वैभव गेहलोत (Vaibhav Gehlot) हे या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत यांना उमेदवारी देण्यात आली होती. राजस्थानमधील जालोर लोकसभा मतदारसंघ सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे, परंतु, २००४ पासून येथे भाजपाची सत्ता आहे. भाजपाने यापूर्वी दोन वेळा ही जागा जिंकली आहे. जालोर मतदारसंघात वैभव गहलोत हे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र आहेत. मतमोजणीच्या वेळी भाजपाचे लुम्बराम यांना ७ लाख ९६ हजार मतांनी विजयी झाले असून, विरोधीपक्षातील उमेदवार वैभव गहलोत यांना ५ लाख ९५ हजार मतांनी दारुण पराभव झाला. (Lok Sabha Election Result 2024)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.