Lok Sabha Election Result : महाराष्ट्रात भाजपाच नंबर वन; काय सांगते आकडेवारी? 

वडणुकीतील निकालाच्या आकडेवारीचा (Lok Sabha Election Result) विचार केला असता महाराष्ट्रात मविआला ४३.५१ टक्के मते मिळाली, तर एनडीएला ४३.६० टक्के मते मिळाली आहेत.

364
लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result) जाहीर होताच देशातील जवळ जवळ सर्वच एक्झिट पोल फोल ठरले आहेत. कारण यात देशात भाजपाला ४०० पार दूरच साधा २५० पर्यंतचाही आकडा गाठता आला नाही. महाराष्ट्रात एकूण ४८ पैकी महायुतीला १७ जागा मिळाल्या. त्यामुळे महाविकास आघाडीचा गुलाल उधळला. मात्र निवडणुकीच्या निकालातील आकडेवारीचा अभ्यास केल्यास राज्यात भाजपाच नंबर वन असल्याचे दिसते.
निवडणुकीतील निकालाच्या आकडेवारीचा (Lok Sabha Election Result) विचार केला असता महाराष्ट्रात मविआला ४३.५१ टक्के मते मिळाली, तर एनडीएला ४३.६० टक्के मते मिळाली आहेत. यात एकट्या भाजपाला २६.१८ टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे राज्यात मतांच्या दृष्टीने भाजपा पहिल्या क्रमांकावर आहे. त्या खालोखाल काँग्रेसला १६.९२ टक्के तर तिसऱ्या क्रमांकावर उबाठाला १६.७२ टक्के मते मिळाली आहेत.
पक्षनिहाय मतांची टक्केवारी
महायुती (४२.७३)
  • भाजपा : २६.१८%
  • राष्ट्रवादी काँग्रेस : ३.६०%
  • शिवसेना : १२.९५%

महाविकास आघाडी (४३.९५)

  • काँग्रेस : १६.९२%
  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) : १०.२७%
  • शिवसेना (उबाठा) : १६.७२
  • सीपीआय : ०.०१ %
  • सीपीआय (एम) : ०.०३%
इतर 
  • एआयएफबी : ०.०२ %
  • एआयएमआयएम : ०.६१ %
  • बसपा : ०.७३ %
  • नोटा : ०.७२ %
  • इतर : ११.२३ %
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.