Lok Sabha Election Result : हिंदू मतांमधील फूट ठरली महाराष्ट्रात महायुतीच्या पराभवाला कारणीभूत

२०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकीत हिंदू एकगठ्ठा मते भाजपाकडे गेले होते, पण २०२४ च्या निवडणुकीत हिंदूंच्या मतांमध्ये जातीजातीत आणि भाषिक फूट पडली, ज्यामुळे भाजपाप्रणित महायुतीला फटका बसला आहे.

205
Lok Sabha Election 2024: पक्ष बदलून निवडणूक लढवणारे 66% उमेदवार पराभूत, विजय नोंदवण्यात कोण यशस्वी ? वाचा सविस्तर
लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result) धक्कादायक लागला, या निकालात सगळे एक्झिट पोल फोल ठरले. राज्यात महायुतीने ‘४५ पार’ अशी घोषणा केली होती, प्रत्यक्षात मात्र अर्ध्या जागाही महायुतीच्या पारड्यात पडल्या नाहीत. यामागे हिंदू मतांमध्ये फूट पडल्याचे प्रमख कारण समोर आले आहे. २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकीत हिंदू एकगठ्ठा मते भाजपाकडे गेले होते, पण २०२४ च्या निवडणुकीत हिंदूंच्या मतांमध्ये जातीजातीत आणि भाषिक फूट पडली, ज्यामुळे भाजपाप्रणित महायुतीला फटका बसला आहे.

चंद्रपूर : हिंदूंमध्ये जाती जातीत फूट  

चंद्रपूर मतदारसंघात भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झाला, त्याठिकाणी काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विजयी झाल्या. या ठिकाणी हिंदूंच्या मतांमध्ये जातीय फूट पडल्याने त्याचा फायदा काँग्रेसला झाला. या मतदारसंघात ४५ टक्के लोकसंख्या ही धनोजी कुणबी जातीची आहे. प्रतिभा धानोरकर याही धनोजी कुणबी जातीच्या आहेत. हिंदुत्ववादी पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना हिंदुत्ववादी पक्षाचे उमेदवार म्हणून हिंदूंची मते मिळणे अपेक्षित होते, परंतु या ठिकाणी मतदारकेंद्रापर्यंत आलेल्या मतदारांनी धानोरकर यांची जात पाहून मतदान केले. धनोजी कुणबी मतदारांनी प्रतिभा धानोरकर यांच्या पारड्यात मते टाकली. या मतदारसंघात ५ टक्के मतदार मुसलमान आहेत. तर १० टक्के आदिवासी आहेत. प्रतिभा धानोरकर यांना दीड लाखाहून अधिक मताधिक्क्य मिळाले. काँग्रेस उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून प्रामुख्याने जातीचा मुद्दा अतिशय पद्धतशीरपणे प्रचारात लावून धरला होता. याशिवाय ओबीसीचा मुद्दाही त्यांनी लावून धरला आहे. (Lok Sabha Election Result)

मुंबई दक्षिण : हिंदूंमध्ये मराठी – गुजराती फूट  

मुंबई दक्षिण मतदारसंघात उबाठाचे अरविंद सावंत विजयी झाले, तर शिंदे गटाचे यामिनी जाधव पराभूत झाल्या. या निवडणुकीत भाजपाकडून इच्छूक उमेदवार होते, पण शिंदे गटाने ही जागा घेतली. तसेच जाणीवपूर्वक या ठिकाणी मराठी – गुजराती वाद उकरून काढण्यात आला. या मतदारसंघात २८ टक्के गुजराती मतदार होते. या ठिकणी दक्षिण मुंबईत ज्या भागात सर्वाधिक गुजराती भाषिक मतदार होता तो मलबार हिल आणि त्या परिसरातील मतदार मतदानासाठी बाहेरच पडला नाही, इथे हिंदूंमध्ये भाषिक फूट पडल्यामुळे या ठिकाणी भाजपाला फटका बसला. (Lok Sabha Election Result)

मुंबई उत्तर पूर्व : मराठी गुजराती भाषिक फूट

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात उबाठाचे संजय दिना पाटील विजयी झाले तर भाजपचे मिहीर कोटेचा पराभूत झाले. या ठिकाणी मुसलमान बहुल मतदारांनी एकगठ्ठा संजय दिना पाटील यांना मते दिली, मात्र दुसऱ्या बाजूला घाटकोपर आणि मुलुंड येथील गुजराती मतदार मतदानासाठी बाहेर पडलाच नाही, हिंदूंमध्ये पडलेली ही भाषिक फूट महाविकास आघाडीसाठी फायद्याची ठरली.

भिवंडी  :  हिंदूंमध्ये जाती जातीत फूट 

भिवंडी येथील मतदारसंघात काँग्रेसच्या बाळ्या मामा यांनी भाजपाचे कपिल पाटील यांना पराभूत केले. या ठिकाणी आगरी आणि कुणबी समाज मोठ्या संख्येने आहेत. या ठिकाणी हिंदुत्ववादी पक्षाचे नेते म्हणून भाजपाचे कपिल पाटील यांना ही मते मिळणे अपेक्षित होते. मात्र आगरी मते सगळी बाळ्या मामा यांच्याकडे फिरली, तर कुणबी यांची मते याच ठिकाणी अपक्ष उमेदवार निलेश सांभरे यांच्याकडे फिरली. अशा प्रकारे या मतदरसंघातही जातीजातीच्या नावाखाली हिंदूंमध्ये फूट पडली. (Lok Sabha Election Result)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.