लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result) आश्चर्यजनक समोर आला. मतदान सुरु असताना एकजात सर्वत्र मतदानाचा टक्का वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे सशक्त लोकशाहीसाठी हे चांगले उदाहरण आहे, अशी चर्चा सुरु झाली, परंतु निकाल लागल्यावर हे विधान सपशेल खोटे ठरले. निकालावरून लोकशाहीची थट्टा केली का, अशी चर्चा सुरु झाली. कारण महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे आणि विशेषतः उबाठाचे उमेदवार निवडून आले, त्याठिकाणी विजयी मिरवणुकीत हिरवे झेंडे मोठ्या उत्साहात फडकवले जात होते, यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली.
(हेही वाचा Vanchit Bahujan Aghadi : प्रभावहीन वंचित आघाडीने शिवसेना उबाठाचे ३ आणि काँग्रेसचा एक उमेदवार पाडला)
सोशल मीडियात चर्चेला उधाण
परभणीत उबाठाचे उमेदवार संजय जाधव यांनी रासपचे महादेव जानकर यांना पराभूत केले. अहमदनगरमध्ये शरद पवार गटाचे नीलेश लंके यांनी भाजपाचे डॉ. सुजय विखे पाटील यांना पराभूत केले. सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी भाजपाचे राम सातपुते यांचा पराभव केला. सांगलीत काँग्रेसचे बंडखोर मात्र काँग्रेसनेच अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याने विशाल पाटील यांनी भाजपाचे संजयकाका पाटील यांचा पराभव केला. नाशिकमध्येही शिवसेनेचे हेमंत गोडसे यांचा उबाठाचे राजाभाऊ वाजे यांनी पराभूत केले (Lok Sabha Election Result). या सर्व ठिकाणी त्या त्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुका काढण्यात आल्या, त्यामध्ये केवळ आणि केवळ हिरवे झेंडे फडकताना दिले, सर्वत्र हिरवा गुलाल उधळण्यात आला. हे सर्व फोटो लागलीच सोशल मीडियात व्हायरल झाले. त्यामुळे भाजपा आणि महायुतीच्या विरोधात लढणाऱ्या महाविकास आघाडीला जो विजय मिळाला तो केवळ मुसलमानांच्या मतांमुळेच मिळाला, असा निष्कर्ष सोशल मीडियावर नेटकरी काढू लागले आहेत. विशेष म्हणजे मनसेनेही उबाठाचा विजय भगवा नाही तर हिरवा आहे, असे म्हटले. त्याविषयी उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांची प्रतिक्रिया माध्यमांनी घेतली तेव्हा त्यांनीही याचे समर्थन देत, ‘हो, हिरवा आहे, पुढे काय?’, असे म्हटले.
Join Our WhatsApp Community