Lok Sabha Election : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या; आता प्रतीक्षा मतदानाची

117

देशभरात २०२४ च्या लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) प्रचारसभांची रणधुमाळी सुरू असून, एकूण सात टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहेत. तर २६ एप्रिलपर्यंत दोन टप्प्यातील निवडणूक पूर्ण झाल्या असून, तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघाच्या प्रचार सभा रविवारी थंडावल्या. या प्रचारसभांसाठी अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघासाठी येत्या मंगळवारी ०७ मे रोजी मतदान होणार आहे.

राज्यात तिसऱ्या टप्प्यांतील बारामती, हातकणंगले, कोल्हापूर, माढा, धाराशिव, रायगड, रत्नागिरी – सिंधुदुर्ग, सांगली, सातारा व सोलापूर या लोकसभा मतदारसंघातील प्रचार सभा रविवारी संध्याकाळी ६ वाजता थांबल्या असून, येत्या मंगळवारी या उमेदवारांचे भविष्य मतपेटीत असणार आहे.

बारामती 

बारामती लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election) नणंद आणि भावजय अशी लढत लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीची होत असून, या एकाच कुटुंबातील निवडणुकीकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागून राहिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनित्रा पवार यांना महायुतीकडून तर शरद पवारांची मुलगी खा. सुप्रिया सुळे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर आजित दादांच्या सख्याभावांसह संपूर्ण पवार कुटुंबीय शरद पवार यांच्या मागे एकवटले आहे.

धारशिव 

धारशिव लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उबाठा गटाचे उमेदवार खासदार ओंमप्रकाश राजेनिंबाळकर तसेच महायुतीमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अर्चना पाटील यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी चुरशीची लढत होणार आहे. राजेनिंबाळकर आणि पाटील घराने यांच्यात पूर्वीपासून राजकीय वैर आहेत.

(हेही वाचा Congress : अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेतल्याने पक्षातून विरोध; काँग्रेसच्या महिला नेत्याचा पक्षाला रामराम )

माढा 

माढा लोकसभा मतदार संघ यावेळी अनेक कारणांनी चर्चेत राहिला असून, महायुतीकडून भाजपाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली तर महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार गटाच्या धैर्यशील पाटील यांच्यात लोकसभा निवडणुकीची लढत होणार आहे.

सोलापूर

सोलापूर मतदार संघातील लढत ही दोन यंग उमेदवारांमद्धे होणार असून, महाविकास आघाडीतील कॉंग्रेसच्या आमदार प्राणिती शिंदे आणि महायुतीतील भाजपाचे आमदार राम सातपुते यांच्यात लढत होणार आहे. सोलापूर मतदारसंघात या दोन यंग उमेदवारांमध्ये मतदानाचा काय परिणाम होईल, हे पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

लातूर 

लातूर मतदार संघ हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा तर या मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे सुधाकर शृंगारे तसेच महाविकास आघाडीच्या कॉंग्रेसकडून डॉ. शिवाजी कोळगे यांच्यात लोकसभा उमेदवारीसाठी चुरशीची लढत होणार आहे.

कोल्हापूर

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जपलेल्या कोल्हापूर मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेच्या संजय मंडलिक तर महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांच्यात लोकसभा उमेदवारीची लढत होणार आहे.

सांगली 

सांगली मतदारसंघात तिरंगी लढत होणार असून, महायुतीकडून भाजपाचे संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून, महाविकास आघाडीच्या उबाठाकडून चंद्रहार पाटील तर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात लोकसभा उमेदवारीसाठी तिरंगी लढत होणार आहे.

सातारा 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारसदार असलेल्या सातारा जिल्ह्यात महायुतीकडून भाजपाचे उमेदवार, छत्रपती शिवरायांचे वारसदार उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीतील शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांच्यात लोकसभा लढत होणार आहे.

(हेही वाचा जी भाषा पाकिस्तान करतेय तिच भाषा काँग्रेस का करतेय? Ashish Shelar यांचा घणाघात)

रायगड 

रायगड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील उबाठा गटाचे नेते नंत गीते यांच्याविरुद्ध महायुतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील तटकरे अशी लढत होणार आहे. २०१४ च्या लोकसभा लाटेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील तटकरे यांचा दोन हजार मतांनी पराभव झाला होता.

हातकणंगले 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी रिंगणात असल्यामुळे हातकणंगले-लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीतील उबाठा गटाचे सत्यजीत पाटील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महायुतीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. राणे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून उबाठा गटाचे नेते विनायक राऊत यांच्यात लढत होणार आहे. नारायण राणे व उद्धव ठाकरे यांच्यातील लढत सर्वश्रुत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.