Lok Sabha Election : उबाठाने लोकसभेसाठी १८ जागांवर केला दावा

246

लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) अवघ्या काही दिवसांत घोषित होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आता तयारीला लागले आहेत. आघाडी आणि युतीमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरु झाल्या आहेत. उबाठा गटाने लोकसभेच्या तब्बल १८ जागांवर दावा केला आहे.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर सतत बैठकांचे सत्र सुरु आहे. आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपासंबंधी एकमत झाल्याची माहिती आहे. या उबाठा गटाने १८ जागांवर दावा केला आहे. या १८ मतदार संघात निवडणूक समन्वयकाची घोषणाही करण्यात आली आहे. त्यामध्ये, मुंबईतील ४ आणि ठाण्यातील जागेवरही त्यांनी समन्वयकाची नियुक्ती केली आहे. तर, मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यातील जागांवरील मतदारसंघात निवडणूक (Lok Sabha Election) समन्वयक नेमले आहेत. त्याशिवाय कोकणातील रायगड तर प.महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि मावळ मतदारसंघातही समन्वयकांची नेमणूक केली आहे. त्यामुळे, शिवसेनेने अप्रत्यक्षपणे १८ जागांवर दावा केल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने राज्यात मूठ बांधली आहे. महायुतीच्या विरुद्ध महाविकास आघाडीने रणशिंग फुंकले आहे.

(हेही वाचा Join Family : नुकत्याच आई झालेल्या महिला एकत्र कुटुंबात राहतात तेव्हा नैराश्यापासून दूर असतात; फिनलँडच्या हेलसिंकी विद्यापीठाचा अहवाल)

शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेसची जागावाटपावर चर्चा सुरू आहे. त्यातच, वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनाही महाविकास आघाडीत घेण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी या तिन्ही पक्षांचं जागावाटप कसं असेल आणि वंचितला किती जागा दिल्या जातील, यावर राजकीय वर्तुळाच चर्चा होते. तर, शिवसेनेकडून गत पंचवार्षिकमध्ये जिंकलेल्या १८ जागांवर दावा केला जात आहे. त्यातच, आज शिवसेना उबाठाकडून लोकसभेच्या १८ मतदारसंघातील निवडणूक समन्वयकांची नेमणूक करण्यात आल्याने ठाकरे गटाचा हा दावा जवळपास निश्चित झाला की काय, असेच म्हणता येईल.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.