Lok Sabha Election Voting : पवई हिरानंदानी येथे 3 तास मतदान खोळंबले; कलाकरांसह नागरिक संतापले

271

सोमवारी, २० मे रोजी महाराष्ट्रात अंतिम आणि पाचव्या टप्प्यासाठी मतदान (Lok Sabha Election Voting) सुरु झाले, सकाळपासून मुंबई, ठाणे, कल्याण या मतदारसंघात मतदारांचा उत्तमी प्रतिसाद मिळत आहे, परंतु पवई येथील हिरानंदानी या उच्चभू वस्तीतील एक मतदार केंद्रावर मात्र गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. इथे ईव्हीएम मशीन बंद पडल्याने तब्बल २ तास मतदान बंद पडले. यावेळी कलाकार मंडळीही रांगेत ताटकळत बसलेले दिसले. त्यामुळे कलाकार आणि सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला. येथील व्हिडीओ मराठी कलाकार आदेश बांदेकर यांनी व्हायरल केला. त्यामध्ये  तेथील मतदार केंद्रातील नागरिक संतप्त प्रतिक्रिया देताना दिसत होते.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024: ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे मतदार वैतागले, मतदान केंद्रांवर गोंधळ)

इव्हिएम मशीन बंद पडले 

या मतदान केंद्रात बंद पडलेले मतदान यंत्र बदलूनही मतदान खोळंबलेलेच आहे. त्यातच शिंदे गटाचे नेते दिलीप लांडे यांना आत सोडल्याने गोंधळ अजून वाढला. ठाकरे गटाचे नेते आणि अभिनेता आदेश बांदेकर यांनी याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. पवईत ईव्हीएम मशीन बंद असल्याची तक्रार अभिनेता आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकरांनी दुपारी 12 च्या सुमारास केली. त्यानंतर जवळपास तासाभराने इव्हीएम रिप्लेस केल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. मात्र त्यानंतर एक तास उलटून गेला, पण अजूनही मतदान (Lok Sabha Election Voting) झाले नाही. अभिनेता आदेश बांदेकर, त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर, अभिनेता आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासह 100 च्या आसपास लोक मतदानासाठी ताटकळले दिसत आहेत  या गोंधळाचा व्हिडीओ आदेश बांदेकर यांनी व्हायरल केला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.