Lok Sabha Election : शिरूर लोकसभा मतदारसंघात कोण असेल लोकांची पसंती, ‘संसदरत्न खासदार’ की ‘दांडगा जनसंपर्क असलेला खासदार’ ?

लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचे प्राबल्य असतानाही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सलग तीनवेळा या मतदारसंघात विजय मिळवण्याची किमया साधली होती.

183

शिरुर लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election) महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार, मावळते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात थेट लढत होत आहे. २०१९ च्या निवडणुकीत कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा पराभव करून दिल्ली गाठली होती. आताही दोन्ही उमेदवारांना एकमेकांचे आव्हान आहे. मात्र, गत निवडणुकीत कोल्हे यांच्या पाठिशी असलेले अजित पवार यंदा आढळराव पाटील यांचा प्रचार करत आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election)  महायुतीच्या जागावाटपात पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिरुर लोकसभेत छगन भुजबळ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार होते. मात्र, भुजबळांनी शिरुरमधून लढण्यास नकार दिला. त्यानंतर आढळराव पाटलांना उमेदवारी मिळाली असे सांगितले जाते. बारामती आणि माढा लोकसभा मतदारसंघानंतर शिरुर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाचा मतदारसंघ आहे. मराठा आरक्षण आंदोलन, ओबीसी मोर्चा आणि विविध मतदारसंघात असलेले स्थानिक प्रश्न यांचा निवडणुकीवर प्रभाव पडू शकतो. गत लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणारे आढळराव पाटील यांनी यंदा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर, त्यांना शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. गुरुवारी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

शिरुर लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election) छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी, छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ वढू- तुळापूर, ज्ञानेश्वर महाराजांची समाधी असलेले आळंदी तीर्थ क्षेत्र, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर, हुतात्मा राजगुरुंचे जन्मस्थळ यांचा समावेश आहे. या लोकसभा मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, भोसरी, आणि हडपसर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी जुन्नरमध्ये अतुल बेनके, आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील, खेडमध्ये दिलीप मोहिते पाटील, शिरुरमध्ये अशोक पवार,भोसरीत भाजपाचे महेश लांडगे तर हडपसरमध्ये चेतन तुपे हे आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांचे प्राबल्य असतानाही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सलग तीनवेळा या मतदारसंघात विजय मिळवण्याची किमया साधली होती. आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे अशोक पवार वगळता अजित पवार राष्ट्रवादी गटाचे ४ तर भाजपाचा १ आमदार असून ही बाब आढळराव पाटील यांच्यासाठी जमेची आहे. दुसरीकडे सामान्य लोकांमध्ये ‘राजा शिवछत्रपती’ आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकांमुळे डॉ. कोल्हे प्रचंड लोकप्रिय आहेत. तसेच शरद पवार यांच्या सर्वात जवळचे नेते असल्याने त्यांच्याविषयी सहानुभूती आहे. अशा परिस्थितीत शिरुरचा बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील रिंगणात असून अमोल कोल्हे गड राखण्यात यशस्वी होणार का हा प्रश्न आहे.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024: शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर)

२०१९ च्या निवडणुकीत काय घडले?

‘राजा शिवछत्रपती’ या टीव्ही मालिकेमुळे प्रसिद्ध झालेले अमोल कोल्हे यांनी राजकारणाची कास धरत २०१४ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. २०१९च्या लोकसभेपूर्वी तत्कालीन खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्याविरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला तितका तुल्यबळ उमेदवार मिळत नव्हता. त्यावेळी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या अमोल कोल्हेंना राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी दिली होती.

२०१९च्या निवडणुकीवेळी शिवाजी आढळराव पाटलांनी टीका करताना, कोल्हे यांच्या जातीचा उल्लेख केला होता. त्यावर ‘मी छत्रपतींचा मावळा’ असे प्रत्युत्तर देत मराठा मतदार आपल्यापासून दूर जाणार नाही, याची काळजी कोल्हेंनी घेतली होती. मोठ्या प्रमाणात असलेल्या मराठा समाजाने देखील कोल्हेंना मतदान केले होते, असं सांगितलं जातं. याचाच फटका आढळरावांना बसला होता. त्यामुळे गेल्या निवडणुकीत जातीचा मुद्दा तितकासा चालला नसल्याचे दिसून आले होते. मात्र यावेळी मराठा आणि ओबीसींच्या मोर्च्यांमुळे जातीचा मुद्दा आता कितपत प्रभावी ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल

शिरुर मतदारसंघाची पार्श्वभूमी?

शिरुर लोकसभा मतदारसंघ (Lok Sabha Election) हा पश्चिम महाराष्ट्रातील प्रतिष्ठित मतदारसंघांपैकी एक आहे. बारामती आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या खालोखाल शिरुर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. ऐतिहासिकदृष्ट्या या मतदारसंघाला विशेष महत्त्व आहे.

शिरुर लोकसभेत चुरशीची लढाई 

उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत आलेले आढळराव पाटील गत पराभवाचा वचपा काढणार की डॉ. अमोल कोल्हे पुन्हा बाजी मारणार? लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election), पुणे ग्रामीण, शहर आणि पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच लढत होताना दिसून येत आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळाली आहे. तर, शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून महायुतीत राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदारसंघात आता आढळराव पाटील विरुद्ध डॉ. अमोल यांच्यात थेट सामना होणार आहे.

यंदाच्या निवडणुकीत परिस्थिती बदलली

शिरूर लोकसभा मतदारसंघात आंबेगाव, जुन्नर, खेळ-आळंदी, हडपसर, शिरूर आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश येतो. या मतदारसंघात मागील वेळी डॉ.कोल्हे आणि आढळराव-पाटील यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या कोल्हे यांनी सलग तीन वेळा खासदारकी भूषविलेल्या आढळराव-पाटील यांचा पराभव केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली आहे. डॉ. कोल्हे तुतारी घेऊन पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तर त्यांना ठाकरे गट आणि काँग्रेसची साथ मिळणार आहे.

शिवसेना सोडून आढळराव पाटील राष्ट्रवादीत

अजित पवार यांच्यावर टीका करणारे माजी खासदार आढळराव-पाटील शिवसेना सोडून खासदारकीच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आढळराव-पाटील यांना उमेदवारी देण्यास खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांचा तीव्र विरोध होता. त्यांची नाराजी दूर करण्यात सध्यातरी अजित पवार यांना यश मिळाले आहे. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनीही आयात उमेदवार नको म्हणत विरोध केला होता. पण, त्यांचा विरोध डावलण्यात आला. त्यामुळे आमदार मोहिते, लांडे हे आढळराव यांचे मनापासून काम करतील अशी आशा अजित पवारांना आहे. लोकसभा उमेदवारीसाठी आढळराव पाटील यांनी शिवसेनेची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्याच दिवशी त्यांना शिरुर लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024 : सायकल रॅलीच्या माध्यमातून २० मेला मतदारांना मतदानाचे आवाहन)

शिरूर मतदारसंघाची कशी आहे रचना?

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ ‘शिवनेरी’, छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ ‘वढू-तुळापूर’, ज्ञानेश्वर महाराजांनी जीवंत समाधी घेतलेले ‘आळंदी’, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर, हुतात्मा राजगुरूंचे जन्मस्थळ राजगुरुनगर (पूर्वीचे खेड) यांसारख्या स्थळांचा समावेश असलेला मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, भोसरी, आणि हडपसर या विधानसभा मतदारसंघांचा शिरूर लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. या मतदारसंघाचा बराचसा भाग ग्रामीण असला; तरी खेड, चाकण, भोसरी, रांजणगाव यांसारख्या औद्योगिक क्षेत्रामुळे हा मतदारसंघ आपल्याकडे कसा राहील, यासाठी सर्वांचाच प्रयत्न असणार आहे.

 छुप्या, अंतर्गत खेळीमुळे विजयाचे गणित

खेडमधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून येणारे दिलीप मोहिते पाटील यांना अजित पवार यांचे समर्थक मानले जाते. शिरूर विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांचे अमोल कोल्हे यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. भोसरीमधून महेश लांडगे हे या मतदारसंघातील भाजपचे एकमेव आमदार आहेत. चेतन तुपे पाटील हे हडपसरमधून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. कोल्हेंशी त्यांचे चांगले सख्य आहे. हे सारे आमदार आता कोणाच्या मागे किती ताकद लावणार; शिरूर मतदारसंघात काही छुप्या आणि अंतर्गत खेळी खेळल्या जातील का, यावर विजयाची गणितं अवलंबून असतील.

२०१९ च्या निवडणुकीत काय घडले?

‘राजा शिवछत्रपती’ या टीव्ही मालिकेमुळे प्रसिद्ध झालेले अमोल कोल्हे यांनी राजकारणाची कास धरत २०१४ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. २०१९ च्या लोकसभेपूर्वी तत्कालीन खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्याविरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला तितका तुल्यबळ उमेदवार मिळत नव्हता. त्यावेळी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या अमोल कोल्हेंना राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी दिली होती.

२०१९ च्या निवडणुकीवेळी शिवाजी आढळराव पाटलांनी टीका करताना, कोल्हे यांच्या जातीचा उल्लेख केला होता. त्यावर ‘मी छत्रपतींचा मावळा’ असे प्रत्युत्तर देत मराठा मतदार आपल्यापासून दूर जाणार नाही, याची काळजी कोल्हेंनी घेतली होती. मोठ्या प्रमाणात असलेल्या मराठा समाजाने देखील कोल्हेंना मतदान केले होते, असं सांगितलं जातं याचाच फटका आढळरावांना बसला होता. त्यामुळे गेल्या निवडणुकीत जातीचा मुद्दा तितकासा चालला नसल्याचे दिसून आले होते. मात्र यावेळी मराठा आणि ओबीसींच्या मोर्च्यांमुळे जातीचा मुद्दा आता कितपत प्रभावी ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

शिरुर मतदारसंघाची पार्श्वभूमी?

शिरुर लोकसभा मतदारसंघ (Lok Sabha Election) हा पश्चिम महाराष्ट्रातील प्रतिष्ठित मतदारसंघांपैकी एक आहे. बारामती आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या खालोखाल शिरुर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. ऐतिहासिकदृष्ट्या या मतदारसंघाला विशेष महत्त्व आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ ‘शिवनेरी’, छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ ‘वढू-तुळापूर’, ज्ञानेश्वर महाराजांनी जीवंत समाधी घेतलेले ‘आळंदी’, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर, हुतात्मा राजगुरुंचे जन्मस्थळ राजगुरुनगर (पूर्वीचे खेड) यांसारख्या स्थळांचा समावेश आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या मतदारसंघावर भगवा फडकावला. ते तीन टर्म या मतदारसंघाचे खासदार होते. एक काळ असा होता की, या मतदारसंघावर आढळराव पाटील यांचे एकहाती वर्चस्व होते. या लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचे प्राबल्य असतानाही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सलग तीनवेळा या मतदारसंघात विजय मिळवण्याची किमया साधली होती.

दांडगा जनसंपर्क आणि अतिआत्मविश्वास

शिरुरच्या राजकारणात शिवसेनेचे वर्चस्व निर्माण करणाऱ्या आढळराव पाटील यांचे स्वतःचे असे एक वेगळे स्थान आहे. या मतदारसंघात आढळराव पाटील यांच्याकडे दांडग्या जनसंपर्काची शिदोरी आहे. त्यांना शिरुरच्या मतदारांची नस माहिती आहे. मात्र, याबाबतचा अतिआत्मविश्वास त्यांना २०१९ मध्ये नडला होता. याबाबतची काळजी त्यांना यंदा घ्यावी लागेल. त्यामुळेच, यंदाच्या निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील शिरूर मतदारसंघ अमोल कोल्हे यांच्या ताब्यातून पुन्हा खेचून आणणार का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.