देशातील प्रत्येक मतदाराने एक जबाबदार नागरिकाप्रमाणे मतदान करावे. सुट्टी आहे म्हणून फिरायला निघून जाऊ नये असं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभेची निवडणूक जाहीर करताना केलं होतं. मात्र, दिल्लीतील मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करायचे तरी कसे? या एका प्रश्नाने प्रश्न दिल्लीतील निवडणूक अधिकाऱ्यांची झोप उडविली आहे. (Lok Sabha Election)
१८ व्या लोकसभेची निवडणूक
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी १८ वी लोकसभा निवडण्यासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ५४३ जागासाठी सात टप्प्यात निवडणूक होणे आहे. १९ एप्रिलपासून ते १ जूनपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालणार आहे. (Lok Sabha Election)
दिल्लीत २५ मे ला मतदान
देशाची राजधानी दिल्लीत सहाव्या टप्प्यात २५ मे रोजी मतदान होणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षाने दिल्लीतील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राजकीय पक्ष पूर्णपणे सज्ज झाले आहेत. निवडणूक यंत्रणा सुद्धा सक्रिय झाली आहे. (Lok Sabha Election)
निवडणूक अधिकारी चिंतीत
परंतू, २५ मे या तारखेने निवडणूक अधिकाऱ्यांची झोप उडविली आहे. कारण, जेव्हा दिल्लीत मतदान असेल तेव्हा दिल्लीत गर्मीचा भीषण उकाळा असतो. दिल्लीची थंडी जशी प्रसिद्ध आहे तेवढीच जहाल दिल्लीची गर्मी असते. (Lok Sabha Election)
गर्मीत मतदार मतदानासाठी बाहेर पडत नाही
भीषण गर्मीमुळे दिल्लीतील नागरिक मतदानासाठी आधीच कमी बाहेर पडतात. जेव्हा दिल्लीत मतदान होईल तेव्हा अंगाची लाही लाही करणारी गर्मी असेल. त्यात भर पडली आहे ती शाळांच्या सुट्टीची. (Lok Sabha Election)
सुट्ट्यांमध्ये फिरायला जातात
यामुळे दिल्लीतील पालक मुलांना घेऊन बाहेर फिरायला जातात. यावेळी सुद्धा सुट्ट्यांमध्ये दिल्लीत मतदान होणे आहे. याच गोष्टीने सीईओ यांची चिंता वाढविली आहे. नागरिक बाहेर गेले तर मतदानाची टक्केवारी कशी वाढणार ही चिंता त्यांना सतावत आहे. (Lok Sabha Election)
आकडेवारी सुद्धा घसरली
आकडेवारीवरून दिसून येते की, दिल्लीत जेव्हा जेव्हा गर्मीत मतदान झाले मतदानाची टक्केवारी खाली घसरली. २०१४ मध्ये १० एप्रिलला मतदान झाले होते. तेव्हा ६५.१० टक्के मतदान झाले होते. २०१९ मध्ये १२ मे रोजी मतदान झाले होते. यावेळी ६०.६ टक्के मतदान झाले होते. २०१४ च्या चार टक्के कमी होते हे मतदान. (Lok Sabha Election)
२५ मे ला मतदान
आता २५ मे रोजी मतदान आहे. शाळांना ११ मे पासून सुट्ट्या लागत आहे. खासगी शाळांना सुद्धा २० मे पासून सुट्ट्या लागणार आहेत. अशात गर्मीमुळे लोकं बाहेर फिरायला गेले तर मतदानाची टक्केवारी वाढविणे अवघड झाल्याशिवाय राहणार नाही. दोन महिने आहेत तरीसुद्धा दिल्ली निवडणूक अधिकारी यांच्याकडे मतदारांना मतदान प्रोत्साहित करण्यासाठी दोन महिने आहेत. (Lok Sabha Election)