लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) पहिल्या टप्प्याची अधिसूचना निघाली असून आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूरची जागा आहे.या मतदारसंघासाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार असून या मतदारसंघांसाठी ही अधिसूचना लागू झाली आहे. आज बुधवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी अजूनही या मतदारसंघांमध्ये राजकीय पक्षांचे उमेदवार कोण असतील हे मात्र घोषित झालेल्या नसल्याने आज किती अर्ज भरले जात आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Lok Sabha Elections 2024)
पहिल्या टप्प्यात भाजपकडून नागपुरातून नितीन गडकरी, चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार हे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मात्र भंडारा-गोंदिया तसेच गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण राहणार याचा सस्पेन्स कायम आहे. रामटेक संदर्भातही महायुतीचा निर्णय होऊ शकलेला नाही. (Lok Sabha Elections 2024)
निवडणुकीचा कार्यक्रम असा आहे…
आजपासूनच म्हणजेच बुधवारपासून नामनिर्देशन पत्र स्वीकारले जात आहेत. तर २७ मार्चपर्यंत उमेदवारांना त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करता येतील व २८ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. तर ३० मार्च उमेदवारी अर्ज परत घेण्याची अखेरची मुदत असणार आहे. (Lok Sabha Elections 2024)
तसे पाहता २० मार्च ते २७ मार्च उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालावधीमध्ये तीन दिवस प्रशासनिक सुट्टी आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना पाचच दिवस मिळणार आहेत. असे असताना देखील अजूनही राजकीय पक्षाकडून उमेदवारांची घोषणा झालेली दिसत नाही. (Lok Sabha Elections 2024)
मंडप सजला परंतु नवरदेव कोण ?
लोकशाहीचे (Democracy) सर्वात मोठे पर्व म्हणून मानले जाणारे लोकसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर देखील अजूनही उमेदवारांची घोषणा झालेली नसल्याने आणि त्यातल्या त्यात पहिल्या टप्प्याचे निवडणुकीचे अर्ज आजपासून दाखल करण्यास सुरुवात होणार असताना देखील राजकीय पक्षांकडून भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षाकडनं या ठिकाणचे उमेदवार घोषित झालेले नाहीत. त्यामुळेच मंडप सजला आहे परंतु नवरदेव कोण आहे याची उत्सुकता मतदारांना लागून राहिली आहे. (Lok Sabha Elections 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community