Lok Sabha Elections 2024 : नवीन लोकसभेतील ५४३ पैकी ५०३ खासदार कोट्यधीश

Lok Sabha Elections 2024 : टक्केवारीत बघितलं तर देशातील ९३ टक्के खासदार आता कोट्यधीश आहेत.

148
Lok Sabha Elections 2024 : नवीन लोकसभेतील ५४३ पैकी ५०३ खासदार कोट्यधीश
  • ऋजुता लुकतुके

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार स्थापन होत आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, या लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या ५४३ खासदारांपैकी किती तब्बल ९३ टक्के खासदार करोडपती असल्याची माहिती मिळाली आहे. ९३ टक्के म्हणजे ५०४ खासदार हे कोट्यधीश आहेत. (Lok Sabha Elections 2024)

४ जूनला देशातील लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये निवडून आलेल्या ५४३ खासदारांपैकी ९३ टक्के म्हणजेच ५०४ खासदार करोडपती आहेत. २०१९ आणि २०१४ च्या तुलनेत २०२४ मध्ये निवडूण आलेले मोठ्या प्रमाणात खासदार हे करोडपती असल्याचे समोर आले आहे. ५०४ खासदार हे कोट्यधीश आहेत. २०१९ मध्ये ८८ टक्के खासदार हे कोट्यधीश होते. तर २०१४ च्या लोकसभेत ८२ टक्के खासदार हे कोट्यधीश होते. (Lok Sabha Elections 2024)

(हेही वाचा – Shiv Sena UBT : शिवसेना भवनच्या अंगणात देसाईंना शिवसैनिकांनी नाकारले)

हे आहेत सर्वात श्रीमंत खासदार

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या टॉप-३ श्रीमंत खासदारांची संपत्ती मोठ्या प्रमणात आहे. या सर्वांची संपत्ती हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही खासदार एनडीएचे आहेत. निवडणूक हक्क संघटना असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने यावर्षी निवडून आलेल्या सर्वात श्रीमंत खासदारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. एडीआरच्या अहवालानुसार आंध्र प्रदेशातील गुंटूरमधून निवडून आलेले टीडीपी खासदार चंद्रशेखर पेम्मासानी हे सर्वात श्रीमंत खासदार आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती ५,७०५ कोटी रुपये आहे. तर तेलंगणातील भाजपाच्या चेवेल्ला लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले कोंडा विश्वेश्वरा रेड्डी हे दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत खासदार आहेत. त्यांची एकूण संपत्ती ४,५६८ कोटी रुपये आहे. तर कुरुक्षेत्र, हरियाणाचे भाजपा खासदार नवीन जिंदाल हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत खासदार आहेत. त्यांची एकूण संपत्ती १,२४१ कोटी रुपये आहे. (Lok Sabha Elections 2024)

महाराष्ट्रात सर्वात श्रीमंत खासदार कोण? असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. तर भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले हे राज्यातील सर्वात श्रीमंत खासदार आहे. उदयनराजे भोसले यांची संपत्ती तब्बल २२३ कोटी रुपये इतकी आहे. सातारा लोकसभेत झालेल्या अटीतटीच्या लढतीत उदयनराजे भोसले यांनी शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा ३२ हजार मतांनी पराभव केला आहे. (Lok Sabha Elections 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.