Lok Sabha Elections : महाराष्ट्रातील आठ जागांसह १२ राज्यांमधील ८९ लोकसभा जागांसाठी अधिसूचना जारी

गुरुवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु

200
Lok Sabha Election 2024: भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शनिवारी अखेरचा दिवस

महाराष्ट्रातील आठ जागांसह १२ राज्यांमधील ८९ लोकसभा जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया गुरुवार (२८ मार्च) पासून सुरू झाली. २६ एप्रिल रोजी होणाऱ्या संसदीय निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगाने गुरुवारी सकाळी राष्ट्रपतींच्या वतीने अधिसूचना जारी केली. या टप्प्यांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ४ एप्रिल आहे. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ज्या आठ जागांवर निवडणूक होणे आहे त्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड, आणि परभणी या जागांचा समावेश आहे. (Lok Sabha Elections)

५ एप्रिल रोजी जम्मू-कश्मीर वगळता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. जम्मू-कश्मीरमध्ये ६ एप्रिलला छाननी होणार आहे. या टप्प्यात बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघातही मतदान होणार आहे. २० मार्च रोजी पहिल्या टप्प्यासाठी जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेत बाह्य मणिपूर मतदारसंघातील निवडणुकीची अधिसूचना समाविष्ट करण्यात आली होती. बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघातील १५ विधानसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघातील १३ विधानसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. (Lok Sabha Elections)

दुसऱ्या टप्प्यात ज्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यामध्ये आसाम, बिहार, छत्तीसगड, जम्मू आणि कश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल याशिवाय बाह्य मणिपूरचा काही भाग समाविष्ट आहे. (Lok Sabha Elections)

(हेही वाचा – Major League Cricket : अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेट स्पर्धा दुसऱ्या हंगामासाठी तयार)

आसाम – दारंग-उदलगुरी, दिफू, करीमगंज, सिलचर, नागाव
बिहार – किशनगंज, कटिहार, पूर्णिया, भागलपूर, बांका
छत्तीसगड – राजनांदगाव, महासमुंद, कांकेर

कर्नाटक – उडुपी चिकमंगळूर, हसन, दक्षिण कन्नड, चित्रदुर्ग, तुमकूर, मंड्या, म्हैसूर, बंगलोर, चामराजनगर, बंगळुरू उत्तर, बंगलोर सेंट्रल, बंगलोर दक्षिण, चिक्कबल्लापूर, कोलार

केरळ – कासरगोड, कन्नूर, वडकारा, वायनाड, कोझिकोड, मलप्पुरम, पोन्नानी, पलक्कड, अलाथूर, थ्रिसूर, चालकुडी, एर्नाकुलम, इडुक्की, कोट्टायम, अलाप्पुझा, मावेलीकारा, पठाणलम, कोट्टालम, तिरुवनंतपुरम

मध्यप्रदेश – टिकमगड, दमोह, खजुराहो, सतना, रेवा, होशंगाबाद, बैतूल
महाराष्ट्र – बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी

मणिपूर – बाह्य मणिपूर

राजस्थान – टोंक-सवाई माधोपूर, अजमेर, पाली, जोधपूर जालोर, उदयपूर, बांसवाडा, चित्तोडगड, राजसमंद, भीलवाडा, कोटा, झालावाड-बरन

त्रिपुरा – त्रिपुरा पूर्व

उत्तरप्रदेश – मरोहा, मेरठ, बागपत, गाझियाबाद, गौतम बुद्ध नगर, बुलंदशहर, अलीगढ, मथुरा

पश्चिम बंगाल – दार्जिलिंग, रायगंज, बलुरघाट

जम्मू काश्मीर – जम्मू

काँग्रेसने दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी फक्त दोन नावे जाहीर केली आहेत.

१) अमरावती- बळवंत वानखेडे
२) नांदेड- वसंतराव चव्हाण (Lok Sabha Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.