Lok Sabha Elections 2024 : शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही राष्ट्रवादीवर संशय का ?

248
Lok Sabha Election : काँग्रेसची ४३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
शिवसेना फुटी नंतर ज्या पद्धतीत शिवसैनिक फुटीरगटावरती आक्रमकपणे हल्ला चढवतात त्या पद्धतीने राष्ट्रवादी मध्ये फूट पडल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते फुटीरगटावरती हल्ला चढवताना दिसत नाही. यामुळेच मनसेच्या वर्धापन दिनावेळी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट आपसात एकच असल्याचे बोलून दाखवले. या सर्वांना काही कारणे देखील तसेच दिसून येत आहेत. (Lok Sabha Elections 2024)
नक्की दोघांमध्ये फरक काय ?
शिवसेना फुटी नंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटामध्ये गेलेल्या आमदारांना पुन्हा शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश नाही अशा प्रकारची घोषणा उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आदित्य ठाकरे यांनी देखील बोलून दाखवली. मात्र दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या फुटी नंतर अजित पवार गटातील आमदार पुन्हा एकदा शरद पवार गटात येत असताना त्यांना पवार गटाचे दरवाजे उघडे असल्याचे दिसून येत आहेत. यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जरी फूट पडली असली तरी शिवसेनेप्रमाणे फुटीरगटावरती आक्रमक भूमिका न घेता पुन्हा एकदा जुळवून घेण्याची भाषा दिसून येत आहे. शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने फुटीरगटावरती सोशल मीडिया तसेच रस्त्यावरती विरोधात उभे राहिलेले दिसतात तसे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दिसून येत नाहीत. त्यामुळेच जनमानसामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटी नंतर राष्ट्रवादीच्या फुटी संदर्भात साशंकता निर्माण करणारे वातावरण समोर दिसून येते. दोन दिवस आधी झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट आत मधून एकच असल्याची जनभावना आपल्या भाषणात बोलून दाखवली होती. ज्या पद्धतीने शिवसैनिक रस्त्यावरती देखील आक्रमकपणे उभे राहिलेले पाहण्यास मिळतात तसे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तेवढे आक्रमक झालेले दिसून येत नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीचे दोन्हीही गट कधीही एकत्र येऊ शकतात असे चित्र समोर येत आहे. (Lok Sabha Elections 2024)
निलेश लंके यांची घरवापसी…
लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) गटाला मोठा धक्का बसणार आहे. आमदार निलेश लंके (Nilesh Lanka) आज शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.निलेश लंके हे पारनेरचे आमदार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला हा मोठा धक्का बसला आहे. दक्षिण अहमदनगरमधून निलेश लंके लोकसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून निलेश लंके शरद पवार गटात दाखल होणार असल्याची चर्चा होती. (Lok Sabha Elections 2024)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.