Lok Sabha Elections : निवडणुकीपूर्वी भाजपचा नवा नारा; ‘फिर एक बार मोदी सरकार’ असेल प्रचार गीत

ही गाणी २४ प्रादेशिक भाषांमध्ये आहेत. पंतप्रधान मोदी सरकारनुसार या गाण्यामध्ये विविध प्रदेश, विविध गट आणि समाजातील विविध घटकांच्या सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रित केले आहे.

214
Lok Sabha Election 2024 : भाजपा मोठ्या चेहऱ्यांना तिकीट नाकारणार?

लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections) भारत मंडपम येथे नुकत्याच झालेल्या भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान ‘फिर एक बार मोदी सरकार’ हे प्रचार गीत प्रसिद्ध करण्यात आले. ही गाणी २४ प्रादेशिक भाषांमध्ये आहेत. नरेंद्र मोदी सरकारच्या (PM Narendra Modi) दाव्यानुसार विविध प्रदेश, विविध गट आणि समाजातील विविध घटकांच्या सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. (Lok Sabha Elections)

(हेही वाचा – Nawab Malik सभागृहात अजित पवारांच्या गोटात…)

या प्रचार नाऱ्याची जेपी नड्डा यांनी केली होती घोषणा 

‘फिर एक बार मोदी सरकार’ या भाजपच्या प्रचाराचा नारा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी जानेवारी २०२४ मध्ये जाहीर केला होता, जिथे देशभरातील पक्षाच्या नेत्यांनी जाऊन या थीमखाली वॉल पेंटिंग केले होते. ३६० डिग्री पध्दतीचा अवलंब करत भाजपने हे शीर्षक गीत प्रसिद्ध करून प्रचाराच्या डिजिटल टप्प्याला सुरुवात केली आहे. पक्षाने मोदी सरकारची वेबसाइटही पुन्हा एकदा लॉन्च केली आहे. (Lok Sabha Elections)

पीएम मोदींनी कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली

त्याच वेळी, पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) कार्यकर्त्यांना प्रत्येक बूथवर ३७० अतिरिक्त मते मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा दिली, तेव्हा भाजप अध्यक्ष नड्डा यांनी राष्ट्रीय अधिवेशनात यासाठी पदाधिकाऱ्यांसाठी एक छोटी शाळा देखील आयोजित केली होती, हे विशेष. (Lok Sabha Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.