राज्यातील सगळ्या ‘एक्झिट पोल’मध्ये दिलेल्या अंदाजानुसार महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शप) काँग्रेसचा फायदा होणार असून शिवसेना ‘उबाठा’चे यात सगळ्यात जास्त नुकसान होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (Lok Sabha Elections Exit Poll)
काँग्रेस एकवरून पाच-आठ प्रगती
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा केवळ एक खासदार निवडून आला होता तर या निवडणुकीत काँग्रेसच्या किमान ५ ते ८ जागा निवडून येतील, असा अंदाज सर्वच ‘एक्झिट पोल’मध्ये व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे २०१९ ला ४ होते तर सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ३ खासदार होते. या निवडणुकीत त्यांच्या गटाला ३-७ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (Lok Sabha Elections Exit Poll)
(हेही वाचा – Lok Sabha Exit Poll : ‘एक्झिट पोल’नंतर काँग्रेस, शिवसेना उबाठा राजकीय ‘अत्यवस्थ’)
उबाठा १८ वरून ३-५ वर
याउलट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे २०१९ ला एकूण १८ खासदार होते. पक्षात फूट पडल्यानंतर १३ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा दर्शवला. शिवसेना उबाठा गटाने महाविकास आघाडीत राहून ४८ पैकी २१ जागांवर आपले उमेदवार उभे केले. त्यामुळे आता त्यांच्यावर २१ पैकी किमान दोन अंकी जागा निवडून आणण्याची जबाबदारी आहे. मात्र एकाही ‘एक्झिट पोल’मध्ये उबाठाला दोन अंकी जागा दाखवण्यात आलेल्या नाहीत. (Lok Sabha Elections Exit Poll)
काँग्रेसच्या जागा किमान पाच-सात पट वाढणार
याचा अर्थ काँग्रेसच्या जागा किमान पाच-सात पट वाढणार असून राष्ट्रवादीच्या आहेत तेवढ्या टिकतील किंवा वाढतील, पण कमी होण्याची शक्यता नाही, असा हा ‘एक्झिट पोल’चा अंदाज आहे. उबाठाच्या मात्र जागा कमी होत असल्याचे चित्र या ‘एक्झिट पोल’मधून दिसत आहे. त्यामुळे आघाडीत उबाठामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा फायदाच झाला असल्याचे चित्र दिसत आहे. (Lok Sabha Elections Exit Poll)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community