भाजपला टक्कर देण्यासाठी एकत्र आलेल्या इंडी आघाडीला (I.N.D.I. Alliance) बुधवारी (२४ जानेवारी) चांगलाच जोराचा धक्का बसला आहे. कारण ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी लोकसभा निवडणूकीसाठी ‘एकला चलो’ चा नारा दिला आहे. यामुळे इंडी आघाडीमधील (I.N.D.I. Alliance) नेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. शिवाय मोदींना हरविण्याचे स्वप्न देखील धुळीस मिळाले आहे. (Lok Sabha Elections)
लोकसभा निवडणुकीसाठी इंडी आघाडीत (I.N.D.I. Alliance) जागावाटपाची चर्चा सुरू असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोठा धक्का दिला आहे. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी जाहीर करून टाकले. ममतांच्या या भूमिकेनंतर काँग्रेससह आघाडीतील पक्षांनी सावध प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी तर त्यांच्यासाठी जणू पायघड्याच घातल्या आहेत. (Lok Sabha Elections)
ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी बुधवारी मीडियाशी बोलताना बंगालमध्ये स्वबळावर लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. काँग्रेसला जागावाटपाचे अनेकदा प्रस्ताव पाठवूनही मान्य करण्यात आले नाहीत. त्यामुळे आम्ही एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. बंगालमध्ये आम्हीच भाजपचा पराभव करू शकतो, असे त्यांनी म्हटले आहेत. इंडी आघाडीमध्ये (I.N.D.I. Alliance) ममतांच्या या भूमिकेचे पडसाद उमटू लागले आहे. पण सर्व पक्षांतील नेत्यांनी सावध भूमिका घेत ममतांना गोंजारण्याचा प्रयत्न केला आहे. जयराम रमेश म्हणाले, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे वक्तव्य मी वाचले आहे. त्या म्हणाल्या आहेत की, आम्हाला भाजपला हरवायचे आहे. त्यासाठी एकही पाऊल मागे घेणार नाही. त्याच भावनेतून आम्ही पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करीत आहोत. (Lok Sabha Elections)
(हेही वाचा – Delhi Winter : कडाक्याची थंडी… भूकंपाचे धक्के…. धुकेच धुके आणि वाढते प्रदूषण; दिल्लीकरांच्या काळजीत वाढ)
ममतांशिवाय आघाडीची कल्पनाही करू शकत नाही – जयराम रमेश
दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी चर्चेत मार्ग काढला जाईल, असे म्हटलं आहे. खूप लांबचा प्रवास असेल तर कधी कधी रस्त्यात स्पीडब्रेकर येतात. लाल दिवा येतो, याचा अर्थ प्रवास थांबवायचा नसतो. अडथळे पार करून पुढे जायचे असते. कालही असाच प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आला होता. टीएमसी आणि ममता (Mamata Banerjee) या इंडी आघाडीचा (I.N.D.I. Alliance) महत्त्वाचा स्तंभ असल्याचे ते म्हणाले होते. आम्ही ममतांशिवाय आघाडीची कल्पनाही करू शकत नाही, असे म्हणत जयराम रमेश यांनी ममतांचे आघाडीतील महत्त्व अधोरेखित केले. (Lok Sabha Elections)
भाजपला हरवणे आमचे प्राधान्य आहे. आम्हाला अपेक्षा आहे की, सध्या सुरू असलेल्या चर्चेतून मार्ग काढला जाईल. बंगालमध्ये आघाडी म्हणूनच आम्ही लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) लढवू, असे जयराम रमेश यांनी स्पष्ट केले. भारत जोडो न्याय यात्रा उद्या गुरुवारी (२५ जानेवारी) बंगालमध्ये प्रवेश करणार आहे. पण या यात्रेबाबत आपल्याला काहीच माहिती दिली नसल्याचे सांगत ममतांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावरही जयराम रमेश यांनी आघाडीतील सर्व नेत्यांशी मल्लिकार्जुन खर्गे बोलले असल्याचे सांगितले. (Lok Sabha Elections)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community