Lok Sabha Elections : भाजपाला मित्रपक्षांचा फायदा किती तोटा किती?

154
NDA : लोकसभेत घटले पण राज्यसभेत वाढणार!

प्रदेश भाजपाने लोकसभा निवडणुकीनंतर मतदार संघ आणि विभागनिहाय मतदानाचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून महायुतीतील घटक पक्षांकडून सहकार्य आणि मते भाजपाला किती मिळाली आणि भाजपाची त्यांच्या वाट्याला किती गेली, याचा हिशेब सुरू केला आहे. यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची मते भाजपाच्या परड्यात कमी पडल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये होत असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. (Lok Sabha Elections)

सेना-भाजपा नैसर्गिक युती

शिवसेना (शिंदे) हा पक्ष फूटला असला तरी सेना-भाजपा ही तशी नैसर्गिक युती मानली जाते. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकमेकांना सहकार्य आणि मते हस्तांतर होण्यात फार अडचणी आणि वैचारिक घालमेल होत नाही, जितकी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाबाबत होते. (Lok Sabha Elections)

(हेही वाचा – Jitendra Awad यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी; डॉ. राजू वाघमारे यांची मागणी)

राष्ट्रवादीची अपेक्षित मते हस्तांतरित झाली नाहीत

राज्यात महायुतीतील भाजपा २८, शिवसेना १५ आणि राष्ट्रवादी चार तर राष्ट्रीय समाज पक्षाने एक अशा ४८ जागा पाच टप्प्यात लढवल्या. यातील राष्ट्रवादी पक्षाची ताकद असलेल्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात भाजपाचे सातारा मतदार संघाचे उमेदवार उदयनराजे भोसले, माढा मतदार संघातील रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, पुण्यातील मुरलीधर मोहोळ, सांगलीचे संजयकाका पाटील या ठराविक उमेदवारांना तुलनेत राष्ट्रवादीची अपेक्षित मते हस्तांतरित झाली नाहीत, अशी माहिती स्थानिक पातळीवरून मिळाली असल्याचे समजते. (Lok Sabha Elections)

ही ‘राजकीय तडजोड’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यापूर्वी काही मुलाखतीतून शिवसेनेशी असलेली युती नैसर्गिक आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्याशी असलेली युती ही ‘राजकीय तडजोड’ असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे महायुतीतील भाजपा-सेना आणि राष्ट्रवादी यांची मने अद्याप जुळली नसल्याचे एका नेत्याने स्पष्ट केले. (Lok Sabha Elections)

हीच स्थिति महाविकास आघाडीमध्ये

हीच स्थिति महाविकास आघाडीमध्ये आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) यांचे मनोमिलन अद्याप झाले नसून त्यांच्यातील मतांचे हस्तांतरणही समाधानकारक झाले नसल्याचे चित्र आहे. उबाठाची मते काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्याकडे वळलीच नसल्याने उबाठाचा फायदा झाला मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचे नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसून येते. (Lok Sabha Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.