Lok Sabha Elections : अखिलेश यांची डोकेदुखी वाढली

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने आघाडी घेत सोळा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांचाही या यादीत समावेश आहे.

296
Lok Sabha Elections : अखिलेश यांची डोकेदुखी वाढली

लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha Elections) तयारीला सर्वच पक्ष लागले आहेत. मात्र कौटुंबिक कलहामुळे पक्षाचे नुकसान होण्याचा इतिहास देखील सर्वश्रुत आहे. या इतिहासाची पुनरावृत्ती समाजवादी पक्षातही (Samajwadi Party) होण्याची शक्यता आहे. कारण पक्षाला आर्थिक पाठबळ देणाऱ्या मनोज यादव (Manoj Yadav) यांनी अखिलेश सिंग (Akhilesh Singh) यांची साथ सोडली असून भारतीय जनता पक्षाला (BJP) उत्तर प्रदेशात मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. (Lok Sabha Elections)

अखिलेश यांचे विश्वासू मानले जाणारे नेते मनोज यादव (Manoj Yadav) यांनी पक्षाला रामराम केला आहे. डिंपल यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही तासांतच पक्षात बंड सुरू झाल्याने अखिलेश यांची डोकेदुखी वाढली आहे. यादव हे उद्योगपतीही असून अखिलेश यांचे निकटवर्ती मानले जातात. ते आरसीएल ग्रुपचे अध्यक्ष आहेत. पक्षाला सोडचिठ्ठी देताना यादव यांनी गंभीर आरोप केले. (Lok Sabha Elections)

(हेही वाचा – Gyanvapi : देशभरात गाजलेल्या ज्ञानवापीचा काय आहे इतिहास? )

यामुळे मिळाला अखिलेश यांना पहिला मोठा झटका

लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) सर्वच राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) आघाडी घेत सोळा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या पत्नी डिंपल यादव यांचाही या यादीत समावेश आहे. त्यांना मैनपुरी मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. पण त्यामुळे अखिलेश यांना पहिला मोठा झटका बसला आहे. (Lok Sabha Elections)

समाजवादी पक्षाला (Samajwadi Party) सोडचिठ्ठी देताना यादव यांनी गंभीर आरोप केले आहेत. पक्षामध्ये कौटुंबिक कलह अधिक असून स्थानिक पातळीवरील नेत्यांकडून एकमेकांचे पाय ओढले जात असल्याचे यादव यांनी सांगितले. ते मैनपुरी नगरमधील रहिवासी असून मागील अनेक वर्षांपासून सपामध्ये सक्रीय होते. मात्र, पक्षामध्ये महत्वाची पदे न घेता ते पडद्यामागूनच अखिलेश यांची मदत करत होते. (Lok Sabha Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.