Lok Sabha Elections : लोकसभेला शिवसेना २२ जागा लढवणार; वर्षा बंगल्यावर खासदारांच्या बैठकीत ठरली रणनीती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व १३ खासदारांची आढावा बैठक बुधवारी २४ मे रोजी रात्री वर्षा बंगल्यावर घेतली.

161
Lok Sabha Elections
Lok Sabha Elections : लोकसभेला शिवसेना २२ जागा लढवणार; वर्षा बंगल्यावर खासदारांच्या बैठकीत ठरली रणनीती लोकसभा निवडणूक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना लोकसभेला (Lok Sabha Elections) २२ जागा लढवणार असल्याचे कळते. वर्षा बंगल्यावर झालेल्या खासदारांच्या बैठकीत ही रणनीती ठरली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व १३ खासदारांची आढावा बैठक बुधवारी २४ मे रोजी रात्री वर्षा बंगल्यावर घेतली. या बैठकीत त्यांनी खासदारांच्या मतदारसंघातील कामांचा आढाव घेतला. तसेच लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) भाजपा आणि आणि शिवसेनेत कशा प्रकारे जागावाटप होईल, याविषयी चर्चा झाली.

(हेही वाचा – Central Vista : संसदेच्या नूतनवास्तू उद्घाटनावर बहिष्कार ही विरोधी पक्षांची कृती वैफल्यग्रस्ततेची निदर्शक – राहुल नार्वेकर)

उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असताना शिवसेनेने २०१९ मध्ये ज्या २२ जागांवर लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) लढवली, त्या सर्व २२ जागांसाठी तयारी करण्याची सूचना एकनाथ शिंदे यांनी केली. त्या दृष्टीने १३ विद्यमान खासदारांसह इतर जागांचाही आढावा घेऊन लोकसभा निवडणुकीची तयारी केली जाईल, असे ठरवण्यात आले.

हेही पहा – 

संयुक्त मेळावे होणार

याविषयी शिवसेनेचे लोकसभेतील (Lok Sabha Elections) गटनेते राहुल शेवाळे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्व खासदारांची बैठक घेतली. १३ खासदारांच्या लोकसभेच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला. तसेच, लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) जिंकण्याच्या दृष्टीने काय काय करता येईल, याबाबत सविस्तर चर्चा झाली. निवडणुकीपर्यंत शिवसेनेच्या विद्यमान १३ खासदारांच्या मतदारसंघांमध्ये भाजप-शिवसेना आणि आरपीआयचे संयुक्त मेळावे होतील. या सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये विकासकामेही हाती घेतली जातील, असेही त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.