शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी २० मे रोजी मतदान केल्यानंतर ११.५७ वाजता म्हणजेच ‘बारा’ वाजण्याच्या थोडं आधी पत्नी रश्मी आणि दोन पुत्र आदित्य आणि तेजस यांच्यासोबत एक फोटो ‘X’ या समाजमाध्यमांवर पोस्ट केला, त्याला जनतेने प्रचंड ट्रोल केले. काँग्रेसला मतदान केल्यामुळे उद्धव यांची नेटकऱ्यांनी अक्षरशः अब्रू काढली असून एकाने तर ‘काय दिवस आले मातोश्रीवर, काँग्रेसला मतदान केले. शी.. थू..’ अशी उघड प्रतिक्रिया दिली. (Lok Sabha Elections)
मानसन्मान मिळतोय तो भगव्यामुळे
उद्धव ठाकरे यांनी जो फोटो शेअर केला आहे त्यात त्यांनी मतदानाचा हक्क बजावला, असे म्हटले आहे. त्यावर एकाने ‘मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, तशी वेळ आली तर मी शिवसेनेचं दुकान बंद करेन. भगव्याशी गद्दारी कधी करणार नाही,’ असे बोलत असल्याचा बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर केला, ज्यात बाळासाहेब असेही म्हणाले आहेत की, ‘आज जो मानसन्मान मिळतो आहे तो भगव्यामुळे मिळतो आहे.’ (Lok Sabha Elections)
काय वाटलं असेल बाळासाहेबांना आज… त्यांना माहित होत तुम्ही पक्ष संपवणार म्हणून च ते म्हणले मझ्या उद्ध्वस्त ला सांभाळून घ्या pic.twitter.com/3GQbtphzt9
— Avdhut Shahapure (@AvdhutShahapure) May 21, 2024
(हेही वाचा – Pune Car Accident: “अख्खी अग्रवाल फॅमिली क्रिमीनल!” अजय भोसलेंवर निवडणुकीच्या प्रचारावेळी गोळी का झाडली?)
‘करावे तसे भरावे’
एकाने म्हटले ही निवडणूक कायम स्मरणात राहील. बाळासाहेबांच्या कुटुंबातील चार मते काँग्रेसला मिळाली. एका नेटकऱ्याने शरद पवार हे उद्धव ठाकरे यांनी बाहेर थांबण्याचा आदेश देत असल्याची क्लिप टाकून ठाकरे यांची खिल्ली उडवली. तर एकाने मराठी म्हणींचा पाढाच वाचला. त्यात ‘आलिया भोगासी असावे सादर’, ‘करावे तसे भरावे’, ‘उसाच्या पोटी कापूस’, ‘खोट्याच्या कपाळी गोटा’ अशा आशयाच्या या म्हणी आहेत. (Lok Sabha Elections)
— Sagar 🇮🇳 (@Sagar131210) May 20, 2024
‘काळाने वेळ बदलली…!
एकाने अगदी बोलका फोटो शेअर केला. मध्यभागी बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी दोन्ही बाजूला बसलेल्या उद्धव आणि राज ठाकरे यांच्या खांद्यावर आपले दोन्ही हात ठेवलेत. उद्धव यांच्या डोक्यामागे काँग्रेसच्या हाताचे चिन्ह आणि राज यांच्या मागे धनुष्यबाण. त्याला फोटोओळ दिली आहे, ‘काळाने वेळ बदलली…! राज ठाकरे धनुष्यबाणाला, तर उद्धव ठाकरे काँग्रेसला मतदान करणार.’ (Lok Sabha Elections)
मरणोपरांत पण.. वडिलांना शांती नाही..
‘मरणोपरांत पण.. उद्धव ठाकरे वडिलांना शांती मिळू देत नाहीये’, असं म्हणत आणि त्यात एक पोस्टर ज्यात बाळासाहेबांचा फोटो आणि त्यावर ‘आपली निशाणी हाताचा पंजा’, असा मजकूर. अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आणि उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेल्याचा राग काढला. (Lok Sabha Elections)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community