लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने निवडणूक चिन्हासाठी भारत निवडणूक आयोगाकडे तीन पर्याय सुचविले आहेत. त्यात गॅस सिलेंडर, शिट्टी आणि रोड रोलरचा समावेश आहे. यावर निवडणूक आयोगाकडून येत्या एक-दोन दिवसात निर्णय अपेक्षित आहे. (Lok Sabha Elections)
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी (२२ मार्च) नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आयोगाला तीन निवडणूक चिन्हांची यादी दिली. वंचित आघाडीने गेली लोकसभा आणि विधानसभा निवडणूक गॅस सिलेंडर या चिन्हावर लढवली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी हेच चिन्ह मिळावे, असा वंचितचा आग्रह आहे. (Lok Sabha Elections)
(हेही वाचा – Veer Savarkar Movie: स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दणक्यात एंट्री!)
आम्ही निवडणूक आयोगाला आज शुक्रवारी चिन्हाची यादी सादर केली आहे. त्यावर येत्या दिवसात अंतिम निर्णय घेऊ, असे आयोगाने सांगितल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. त्यामुळे आता वंचितला कोणते निवडणूक चिन्ह मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Lok Sabha Elections)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community