Lok Sabha Elections : चंद्रशेखर बावनकुळे यांनी भुजबळ, कीर्तिकरांना विनंती-वजा दम का भरला?

187
Lok Sabha Elections : चंद्रशेखर बावनकुळे यांनी भुजबळ, कीर्तिकरांना विनंती-वजा दम का भरला?
  • सुजित महामुलकर

राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि मंत्री छगन भुजबळ, भिवंडीचे भाजपा उमेदवार कपिल पाटील, शिवसेनेचे मावळते खासदार गजानन कीर्तिकर अशा काही उत्साही नेत्यांना भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगल्या शब्दात विनंती-वजा दम भरला. “महायुतीतील नेत्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी लोकसभा निवडणूक निकालानंतर वरिष्ठ नेत्यांची ‘राऊंड टेबल बैठक’ होईपर्यंत काही बोलू नये,” असे बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (Lok Sabha Elections)

जनतेत वेगळा संदेश जातो

बावनकुळे मंगळवारी २८ मे ला दक्षिण मुंबईतील भाजपाच्या प्रदेश कार्यालयात काही निवडक पत्रकारांशी बोलत असताना महायुतीतील नेत्यांना स्पष्ट शब्दात इशाराच दिला आहे. गेल्या काही दिवसांत विशेषतः निवडणूक प्रचार काळात तसेच निवडणुकीनंतर काही नेत्यांनी अतिउत्साहाच्या भरात प्रतिक्रिया दिल्या. याबाबत बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे जनतेत वेगळा संदेश जातो, ते होऊ नये म्हणून आपण विनंती करत असल्याचे त्यांनी सांगितले. (Lok Sabha Elections)

(हेही वाचा – Veer Savarkar : वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त दिल्ली पब्लिक लायब्ररीच्या वतीने विशेष चर्चासत्राचे आयोजन)

एवढ्या जागा मिळाल्याच पाहिजे

एकनाथ शिंदे सरकारमधील मंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी गेल्या काही दिवसांत महायुतीत संभ्रम निर्माण होईल अशी वक्तव्ये केली. “महायुतीमध्ये आपल्याला ८०-९० जागा (विधानसभा निवडणुकीबाबत) मिळाल्या पाहिजेत. यावेळी (लोकसभा निवडणूक जागावाटप) जी खटपट झाली, ती आता होता कामा नये. आम्हाला एवढ्या जागा मिळाल्याच पाहिजे, हे त्यांना (भाजपा) आपण सांगायला हवे,” असे मत भुजबळ यांनी पक्षाच्या बैठकीत व्यक्त केले. त्याचबरोबर भुजबळ यांनी संविधान बदलाच्या आटोपावरूनही जाहीर मत व्यक्त केले. ‘मोदी सरकार संविधान बदलणार’ हा दलित समाजाच्या मनातील नरेटीव्ह बदलण्यासाठी नाकेनऊ आले, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले होते. (Lok Sabha Elections)

करेक्ट कार्यक्रम करणार

भिवंडीचे लोकसभा उमेदवार कपिल पाटील यांनीदेखील न्यूज चॅनेलशी बोलताना भाजपाच्या एका आमदाराने लोकसभा निवडणुकीत काम केले नाही, असा आरोप करत ‘त्याचा विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जाईल. पक्ष आणि देवेंद्रजीसुद्धा त्याला माफ करणार नाहीत,’ असे वक्तव्य केले होते. (Lok Sabha Elections)

.. तर आनंदच

शिवसेना (शिंदे) मावळते खासदार गजानन कीर्तिकर यांनीही, ‘महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर निवडून आले किंवा नाही, तर माझा काही दोष नाही. पण माझा मुलगा अमोल कीर्तिकर (महाविकास आघाडीचे उमेदवार) निवडून आला तर आनंद होईल,’ असे वक्तव्य ऐन मतदानाच्या दिवशी केले होते. (Lok Sabha Elections)

या सगळ्या वक्तव्यांवरून भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त करत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची राऊंड टेबल बैठक होत नाही तोवर काही बोलू नये, अशी विनंती केली. (Lok Sabha Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.