Lok Sabha Elections : उत्तर-मध्य मुंबईतील महिलांनी फिरवली मतदानाकडे पाठ

मुंबईतील महिलांच्या सहभागाची आकडेवारी राज्य निवडणूक कार्यालयाने प्रसिद्ध केली असून या आकडेवारीवरून मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातील ८.४२ महिला मतदारांपैकी ४.७२ लाख महिलांनी मतदान केले.

234
Lok Sabha Elections : मुंबईत मतदानाचा टक्का घसरला, प्रत्यक्षात मतदारांत वाढ
  • सुजित महामुलकर

मुंबईच्या उत्तरेकडील महिलांनी लोकसभा निवडणुकीत उत्स्फूर्त सहभाग घेत भरघोस मतदान करून आघाडी घेतली तर मतदानाकडे पाठ फिरवणाऱ्यांमध्ये उत्तर-मध्य मतदार संघातील महिला आघाडीवर आहेत. (Lok Sabha Elections)

सर्वाधिक मतदान ४.७२ लाख

मुंबईतील महिलांच्या सहभागाची आकडेवारी राज्य निवडणूक कार्यालयाने प्रसिद्ध केली असून या आकडेवारीवरून मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातील ८.४२ महिला मतदारांपैकी ४.७२ लाख महिलांनी मतदान केले. उत्तर मुंबईतून महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल विरुद्ध महाविकास आघाडीचे भूषण पाटील असा सामना होता. या मतदार संघात मुंबईतील सर्वाधिक मतदान ५७.०२ टक्के नोंदवले गेले आहे. (Lok Sabha Elections)

(हेही वाचा – वातानुकूलित आणि प्रथम श्रेणीतून प्रवास करणाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी Central Railway चा टास्क फोर्स)

३.९१ लाख महिलांनी मतदानाकडे फिरवली पाठ

महिलांचे सगळ्यात कमी मतदान उत्तर-मध्य मतदार संघात, जिथे काँग्रेसने एका महिलेला उमेदवारी दिली होती, अशा मतदार संघात झाले. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना काँग्रेसने उत्तर-मध्य मुंबईतून मैदानात उतरवले होते तर भाजपाने ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली होती. या मतदार संघात एकूण १७.४४ लाख मतदार असून यात ८.०२ लाख महिला आहेत. या ८ लाख महिला मतदारांपैकी ४.११ लाख महिलांनी मतदान केले तर तब्बल ३.९१ लाख महिलांनी मतदानाकडे पाठ फिरवली. या क्षेत्रात एकूण ५१.९८ टक्के मतदान झाले आहे. (Lok Sabha Elections)

दक्षिण मुंबईत सगळ्यात कमी मतदान

मुंबई उत्तर-मध्य व्यतिरिक्त, मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघात महायुतीने महिला उमेदवार यामिनी जाधव (शिवसेना आमदार) यांना महाविकास आघाडीच्या शिवसेना उबाठाचे अरविंद सावंत यांच्यासमोर उभी केली होती. या मतदार संघात एकूण ७.०३ लाख महिला मतदार असून त्यापैकी ३.५१ लाख महिलांनी मतदानात भाग घेतला तर ३.५२ लाख महिलांनी पाठ फिरवली. या मतदार संघातून राज्यात सगळ्यात कमी ५०.०६ टक्के मतदान नोंदवले गेले आहे. (Lok Sabha Elections)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: सहाव्या टप्प्यात सर्वाधिक मतदान, पश्चिम बंगाल अव्वल स्थानी)

थोडक्यात :
  • मुंबईतील एकूण महिला मतदार : ४५.८७ लाख
  • मतदान केलेल्या महिलांची संख्या : २४.४१ लाख

मुंबई उत्तर मतदार संघ : महिला मतदार : ८.४२ लाख, मतदान केले : ४.७२ लाख

मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघ : महिला मतदार : ७.९६ लाख, मतदान केले : ४.३० लाख

मुंबई उत्तर-मध्य मतदार संघ : महिला मतदार : ८.०२ लाख, मतदान केले : ४.११ लाख

मुंबई ईशान्य (उत्तर-पूर्व) मतदार संघ : महिला मतदार : ७.५८ लाख, मतदान केले : ४.१४ लाख

मुंबई दक्षिण-मध्य मतदार संघ : महिला मतदार : ६.८६ लाख, मतदान केले : ३.६३ लाख

मुंबई दक्षिण मतदार संघ : महिला मतदार : ७.०३ लाख, मतदान केले : ३.५१ लाख (Lok Sabha Elections)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.