LS Forth Phase Voting : चौथ्या टप्प्याचे कमी मतदान महायुतीच्या पथ्यावर

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात एकूण ६२.२१ टक्के मतदान झाले असून यात केवळ नंदुरबार आणि बीड या दोनच मतदार संघात ७० टक्क्यापेक्षा अधिक मतदान झाले आहे तर सगळ्यात कमी मतदान पुणे ५३.५४ टक्के झाल्याची नोंद झाली आहे.

155
LS Forth Phase Voting : चौथ्या टप्प्याचे कमी मतदान महायुतीच्या पथ्यावर

लोकसभा २०२४ निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात झालेल्या मतदानात ११ मतदार संघांपैकी चार मतदार संघांमध्ये गेल्या दोन २०१४ आणि २०१९ च्या तुलनेत कमी मतदान झाले आहे आणि ते महायुतीच्या बाजूने जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (LS Forth Phase Voting)

दोन मतदार संघात ७० टक्के पार

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात एकूण ६२.२१ टक्के मतदान झाले असून यात केवळ नंदुरबार आणि बीड या दोनच मतदार संघात ७० टक्क्यापेक्षा अधिक मतदान झाले आहे तर सगळ्यात कमी मतदान पुणे ५३.५४ टक्के झाल्याची नोंद झाली आहे. नंदुरबारमध्ये ७०.६८ टक्के मतदान झाले तर बीड मतदार संघात ७०.९२ टक्के मतदारांनी मतदान केले. नंदुरबार मतदार संघात भाजपाच्या हिना गावीत आणि काँग्रेसचे गोवाळ पाडवी तर बीडमध्ये भाजपाच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) बजरंग सोनवणे अशी लढत आहे. (LS Forth Phase Voting)

(हेही वाचा – काँग्रेसला देशाच्या बजेटमधील १५ टक्के भाग मुसलमानांवर खर्च करायचाय; PM Narendra Modi यांचा आरोप)

चार मतदार संघात कमी मतदान

मावळ (५४.८७ टक्के), शिरूर (५४.१६ टक्के), शिर्डी (६३.०३ टक्के)आणि छत्रपती संभाजी नगर (६३.०३ टक्के) या चार मतदार संघांत गेल्या दोन निवडणुकीच्या तुलनेत कमी मतदान झाले आहे. मावळ मतदार संघात शिवसेनेचे (शिंदे) श्रीरंग बारणे विरुद्ध शिवसेना उबाठाचे संजोग वाघेरे निवडणूक रिंगणात आहेत तर शिरूर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अमोल कोल्हे, शिर्डी मतदार संघात शिवसेनेचे (शिंदे) सदाशिव मंडलिक विरुद्ध शिवसेना उबाठा गटाचे भाऊसाहेब वाकचौरे अशी थेट लढत होत आहे. छत्रपती संभाजी नगर मतदार संघात मात्र तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. या ठिकाणी शिवसेनेचे (शिंदे) संदीपान भुमरे, शिवसेना उबाठाचे चंद्रकांत खैरे आणि ‘एमआयएम’चे इम्तियाज जलील निवडणूक रिंगणात आहेत. (LS Forth Phase Voting)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.