Lok Sabha Intrusion : पंतप्रधान मोदींनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

दैनिक जागरण या हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी मोदी म्हणाले की; "संसदेच्या सुरक्षा उल्लंघनाच्या गंभीरतेला अजिबात कमी लेखू नये आणि म्हणूनच सरकार या प्रकरणावर आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे."

229
Lok Sabha Intrusion : पंतप्रधान मोदींनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

बुधवार १३ डिसेंबर रोजी संसदेच्या (Lok Sabha Intrusion) अधिवेशनात २ जणांनी लोकसभेत आणि २ जणांनी संसदेच्या बाहेर धुडघूस घातला. सागर शर्मा आणि मनोरंजन डी या दोन व्यक्तींनी लोकसभेत घुसून धुराच्या नळकांड्या फोडल्याने आता संसदेच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकारावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभेत जे घडले तो एक अतिशय ‘गंभीर मुद्दा’ असल्याचे मोदींनी सांगितले.

(हेही वाचा – JN.1 case : कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू ; केरळ अलर्ट मोडवर)

दैनिक जागरण या हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींनी (Lok Sabha Intrusion) आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी मोदी म्हणाले की; “संसदेच्या सुरक्षा उल्लंघनाच्या गंभीरतेला अजिबात कमी लेखू नये आणि म्हणूनच सरकार या प्रकरणावर आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे.”

(हेही वाचा – Encounter With Naxalites: छत्तीसगढमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, सीआरपीएफचे अधिकारी हुतात्मा)

नेमकं काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?

“झालेल्या सर्व प्रकारावर (Lok Sabha Intrusion) वाद आणि चर्चा करण्यापेक्षा याच्या खोलात जाऊन चौकशी करण्याची गरज आहे. जी घटना घडली त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लोकसभेचे अध्यक्ष यावर स्वतः लक्ष ठेऊन आहेत. तसेच तपास यंत्रणा देखील कसून चौकशी करत आहेत. या सर्व प्रकारामागे कोण आहे ? त्यांचा हेतू काय आहे हे जाणून घेण्यासाठी या प्रकरणाच्या खोलात जाण्याची गरज आहे.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.