देशातील सध्याचा सर्वाधिक चर्चेचा विषय एकच आणि तो म्हणजे १८ व्या लोकसभेचा अध्यक्ष कोण होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रालोआचे सरकार स्थापन झालं आहे. आता लोकसभेचा अध्यक्ष भाजपाचा होतो की रालोआचा? हे बघणं उत्सुकता निर्माण करणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात रालोआचे सरकार स्थापन झाले आहे. पुढील सोमवारपासून संसदेचे अधिवेशन सुरु होत आहे. १८व्या लोकसभेचं हे पहिलं सत्र असेल. २४ जूनपासून सुरू होणारे हे सत्र ३ जुलै पर्यंत चालेल. तर २७ ते ३ जुलैपर्यंत राज्यसभेचं सत्र असणार आहे. (Lok Sabha President)
अशात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकसभेचे अध्यक्षपद. २६ जून रोजी अध्यक्षपदाची निवड होणे आहे. अध्यक्ष आपलाच व्हावा अशी भाजपाची इच्छा आहे. यासाठी भाजपाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वात मित्र पक्षांसोबत चर्चा करायला सुरुवात केली आहे. लोकसभा अध्यक्ष पदाच्या शर्यतीत माजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला सर्वात पुढे आहेत. याशिवाय भर्तृहरि महताब आणि डी. पुरंदेश्वरी यांच्या नावांचीही चर्चा आहे. तेच चंद्रबाबू नायडूंच्या टीडीपी आणि नितीशकुमार यांच्या जेडीयू कडूनही अध्यक्षपदाची मागणी केली गेली आहे. (Lok Sabha President)
(हेही वाचा – PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळाला पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता, २,००० रुपये बँक खात्यात जमा)
भर्तृहरि महताब ओडिशामधील एक प्रमुख भाजपा नेते आहे. ते आधी नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दलमध्ये होते. नंतर भाजपामध्ये प्रवेश केला. तर डी पुरंदेश्वरी आंध्रप्रदेश भाजपाच्या अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वात भाजपाने राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. याचबरोबर ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपाने चांगली कामगिरी करत बीजेडीला २४ वर्षानंतर सत्तेतून खाली खेचलं आणि राज्यात सरकार स्थापन केले आहे. (Lok Sabha President)
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २६ जून रोजी पंतप्रधान मोदी लोकसभा अध्यक्षांच्या नावाचा प्रस्ताव सादर करतील. लोकसभा अध्यक्ष निवडल्या गेल्यानंतर ते आपल्या मंत्रिमंडळाचा परिचय देतील. यानंतर खासदारांचा शपथविधी होईल. लोकसभा अध्यक्ष पद हे सत्ताधारी पक्ष किंवा आघाडीच्या शक्तीचं प्रतीक असतं. लोकसभेचं कामकाज अध्यक्षच नियंत्रित करतो. संविधानात लोकसभा अध्यक्षाबरोबरच उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचीही तरतूद आहे. जे अध्यक्षांच्या अनुपस्थितीत त्यांची जबाबदारी सांभाळतात. उपाध्यक्ष पदद हे विरोधकांना देण्याची परंपरा आहे. यंदा विरोधी पक्षांची इंडी आघाडी सुद्धा लोकसभेत चांगल्या स्थितीत आहे. त्यामुळे लोकसभेचं उपाध्यक्ष पद विरोधी पक्षाच्या एखाद्या खासदारास दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १६ व्या लोकसभेत NDA मध्ये सहभागी अण्णाद्रमुकचे थंबीदुरई यांना हे पद दिले गेले होतं. तर १७व्या लोकसभेत हे पद कुणालाही दिलं गेलं नव्हतं. (Lok Sabha President)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community