Lok Sabha : राहुल गांधी आणि प्रियंका पळपुटे भावंडं : दिनेश शर्मा

119
Lok Sabha : राहुल गांधी आणि प्रियंका पळपुटे भावंडं : दिनेश शर्मा
  • सुजित महामुलकर

भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. दिनेश शर्मा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका वाड्रा यांच्यावर पळपुटे भावंडं अशा शब्दात टीका केली. (Lok Sabha)

मम्मी आधीच पळाल्या

शर्मा यांनी मुंबई भेटीत अनौपचारिक गप्पा मारताना देशातील राजकीय परिस्थिती आणि लोकसभा निवडणूक यावर भाष्य केले. गांधी परिवाराचा पारंपारिक मतदार संघ रायबरेली मतदार संघाबाबत आपले मत काय असे विचारले असता, “राहुल गांधी यांना तिथे अडचण आहे म्हणून त्यांनी त्यांची बहीण प्रियंका यांच्यावर जबाबदारी सोपवली. ज्या नेत्याने पूर्ण देशभर फिरायला हवे त्या दोनच जागांमध्ये अडकून पडल्या आहेत. हे त्यांचे मोठे अपयश आहे. सगळ्यात आधी त्यांची ‘मम्मी’ राजस्थानला पळून गेल्या. प्रियंका म्हणायच्या की ‘लडकी हूं लढ सकती हूं’. पण पूर्ण देशभरात भ्रमण करून कुठेच मतदार संघ नाही मिळाला आणि लढायचा विचारच सोडला. राहुल गांधी ‘डरो मत’ म्हणत होते, पण अमेठीतून पलायन करत वायनाडला पोहोचले. तिथेही परभवाच्या भीतीने परत अमेठीमध्ये आले, पण अमेठीत पहिले तर स्मृति इराणी यांचा तूफान प्रचार सुरू आहे आणि ते पाहून पुन्हा घाबरून अचानक एका रात्रीत रायबरेलीत पळाले,” असे शर्मा म्हणाले. (Lok Sabha)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : राहुल-प्रियंका अधीर रंजन यांच्यावर नाराज; बंगालकडे फिरकलेसुद्धा नाही)

फडणवीस राज्यात ‘एनडीए’चा चेहेरा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लोकसभा निवडणुकीत तिकीट न देता राज्याच्या राजकारणात सक्रिय राहण्याचे संकेत दिल्याने राज्याचे भावी मुख्यमंत्री फडणवीस असणार का? असे विचारले असता ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना शर्मा म्हणाले, “देवेंद्र फडणवीस एक सर्वमान्य नेता आणि भाजपा तसेच एनडीएचा राज्यातील चेहेरा आहे यात शंकाच नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही त्यांचा आदर करतात,” असे सांगून शर्मा पुढे म्हणाले, “विधानसभेची रणनीती ठरवू तेव्हा यांची घोषणा केली जाईल. ‘एनडीए’चे नेते बसून याबाबतचा निर्यय घेतील. शर्मा यांनी फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात एवढ्यात स्थान दिले जाईल याची शक्यता फेटाळली आणि फडणवीस राज्यातील ‘टॉप’चे नेता आहेत आणि सगळ्याना सोबत घेऊन काम करतात, असे स्पष्ट केले. (Lok Sabha)

भाजपा म्हणजे समुद्र

देशभरात सर्वाधिक आयात नेते महाराष्ट्रात आहेत यावर बोलताना भाजपा प्रभारी शर्मा यांनी भाजपाला राजकारणातल्या समुद्राची उपमा दिली. “भाजपा हा एक समुद्र आहे, जशा सगळ्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात आणि एकरूप होतात तेव्हा समुद्र नाराज होतो का? तसे अन्य पक्षातले कार्यकर्ते भाजपात येतात तेव्हा ते भाजपाची विचारधारा स्वीकारतात. जो स्वीकारणार नाही तो स्वतःला वेगळे करून घेईल,” असे शर्मा यांनी स्पष्ट केले. (Lok Sabha)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.