Lok Sabha Results : मालेगाव मध्य : हा घ्या मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचा ढळढळीत पुरावा

386
Lok Sabha Results : मालेगाव मध्य : हा घ्या मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचा ढळढळीत पुरावा

लोकसभा निवडणूक मतदानात राज्यात मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण झाले असल्याचा ढळढळीत पुरावा समोर आला आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, धुळे लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांना मुस्लिमबहुल मालेगाव मध्य या फक्त एकाच विधानसभा मतदार संघात १.९४ लाख मताधिक्य मिळाले आणि भाजपाचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना केवळ ३,८३१ मतांनी पराभव पत्करावा लागला. (Lok Sabha Results)

लाखांची आघाडी, तीन हजारांनी पराभव

गेल्या दोन निवडणुकीत २०१४ आणि २०१९ मध्ये सुभाष भामरे अनुक्रमे १.३० लाख आणि २.२९ लाख मताधिक्याने विजयी झाले आहेत. २०१४ मध्ये भामरे यांनी उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे बडे नेते अमरिश पटेल यांचा तर २०१९ मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे पुत्र कुणाल यांचा दणदणीत पराभव केला होता. (Lok Sabha Results)

पाच विधानसभा क्षेत्रात भाजपाची आघाडी

धुळे मतदार संघात काँग्रेसच्या माजी आमदार शोभा बच्छाव यांना धुळे लोकसभा मतदार संघात कोणताही जनसंपर्क नसताना तिकीट दिले गेले. त्या बाहेरच्या उमेदवार असल्याने धुळ्यातील सहा विधानसभा मतदार संघांपैकी पाच मतदार संघात भामरे यांच्यापेक्षा कमी मतदान झाले. सटाणा विधानसभा क्षेत्रात भामरे २१,९१३ मतांनी आघाडीवर होते, धुळे शहरात ४,८३२, मालेगाव बाह्यमध्ये ५५,२४२ धुळे ग्रामीणमध्ये ६३,७९८ आणि शिंदखेडामध्ये ४३,४२५ अशी मतांची आघाडी भामरे यांनी घेतली होती. असे असताना केवळ मालेगाव मध्य या मतदार संघात बच्छाव यांनी १,९४,३२७ मतांची आघाडी घेत भामरे यांच्यावर ३,८३१ मतांनी विजय मिळवला. या मतदार संघात भामरे यांना फक्त ४,५४२ मते मिळाली. (Lok Sabha Results)

(हेही वाचा – Trekker Snowstorm Himalayas : हिमालयात हिमवादळात अडकलेल्या ९ ट्रेकर्सचा मृत्यू, १३ जणांना वाचवण्यात यश)

फक्त मुस्लिम आमदार

या आकडेवारीवरून मुस्लिमबहुल मालेगाव-मध्य विधानसभा मतदार संघाचे एकगठ्ठा मतदान शोभा बच्छाव यांना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या विधानसभा मतदार संघात १९७८ पासून (विधानसभा अस्तित्वात आल्यापासून) मुस्लिम समाजाव्यतिरिक्त आमदार एकदाही निवडून आला नाही. सध्या ‘एमआयएम’चे मोहम्मद इस्माईल अब्दुल खलीक हे या मतदार संघाचे प्रतिनिधित्व विधानसभेत करत आहेत. शोभा बच्छाव यांनी १.९४ लाख मतांची आघाडी घेतली, इतके मतदान विधानसभा निवडणुकीत सर्व उमेदवारांचे एकत्रित मतदान केले तरी कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. (Lok Sabha Results)

शोभा बच्छाव नाशिकच्या, मतदान मालेगावात

शोभा बच्छाव यांचे वडील धुळ्यात शासकीय नोकरीला असल्याने त्यांचे प्राथमिक शिक्षण धुळे यथे झाले, इतकाच काय तो बच्छाव यांचा धुळ्याशी संबंध. वास्तविक शोभा बच्छाव या नाशिक जिल्ह्यातील पिंपाळगांव वाखारी येथील रहिवासी आहेत. (Lok Sabha Results)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.