Lok Sabha Security Breach : लोकसभेत उपस्थित खासदारांनी सांगितला धक्कादायक प्रकार

Lok Sabha Security Breach : 13 डिसेंबर रोजी दोन लोकांनी कागदपत्रे घेऊन लोकसभेत उडी मारली. त्यांच्याकडे पिवळा धूर सोडणारी यंत्रणा होती. त्यानंतर संसदेत गदारोळ झाला. खासदारही त्याला पकडण्यासाठी धावले. त्यानंतर एक पुरुष आणि एका महिलेला अटक करण्यात आली.

246
Lok Sabha Security Breach : लोकसभेत उपस्थित खासदारांनी सांगितला धक्कादायक प्रकार
Lok Sabha Security Breach : लोकसभेत उपस्थित खासदारांनी सांगितला धक्कादायक प्रकार

लोकसभेच्या व्हिजिटर गॅलरीतून एका व्यक्तीने उडी मारली. (Lok Sabha Security Breach) 2001 मध्ये आजच्याच दिवशी संसदेवर हल्ला झाला होता. त्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर काही वेळातच लोकसभेतून देशाने पाहिलेली छायाचित्रे भीतीदायक आहेत. हातामध्ये कागदासारखे काहीतरी घेऊन एका माणसाने प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेत उडी मारली.

(हेही वाचा – Aadhar free update : आधार अपडेट करण्याचा कालावधी वाढवला; जाणून घ्या कधी पर्यंत करू शकता…)

त्या वेळी सभागृहात उपस्थित असलेल्या खासदारांनी प्रत्यक्ष स्थिती सांगितली. संसदेचे अधिवेशन (Parliament Winter Session) सुरु असतांना अचानक दोन व्यक्तींनी दालनातून उडी मारली. आधी ते समोरील गॅलरीला लटकत राहिले आणि नंतर एकामागून एक उडी मारत अध्यक्षांच्या आसनाच्या दिशेने जाऊ लागले. त्यानंतर तो खासदारांच्या आसनावरून धाऊ लागला.

खासदारांनी केला पकडण्याचा प्रयत्न

उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) म्हणाले की, ”एक जण मध्यभागी आला आणि नंतर त्याने आपले बूट काढले. खासदार येऊन त्याला पकडेपर्यंत तो गोंधळला. त्यानंतर गॅस गळती सुरू झाली. तो गॅस त्याच्या शूजमध्ये होता की, कुठे होता, हे मला माहीत नाही. तो पिवळा वायू होता. त्यावेळी लोकसभेचे अधिवेशन सुरू होते. खूप आरडाओरडा झाला. त्यानंतर लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.”

(हेही वाचा – Iga Swiatek Player of the Year : इगा स्वितेक सलग दुसऱ्यांदा डबल्यूटीएची सर्वोत्तम खेळाडू )

त्यानंतर विधानसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी सांगितले की, दोन जणांना लोकसभेच्या आतून आणि दोघांना बाहेरून अटक करण्यात आली आहे. यावरून हे स्पष्ट झाले की, एकूण चार लोकांनी चुकीच्या हेतूने संसद संकुलात प्रवेश केला होता.

तो धूर कशाचा होता ?

संसद संकुलात पुरेशी सुरक्षा नसल्याचा आरोप समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव (Dimple Yadav) यांनी केला आहे. ‘लोक इथे येऊन एकमेकांना धक्के देत चालतात. सरकारने लक्ष दिले पाहिजे. ही संपूर्ण सुरक्षा यंत्रणेची चूक आहे’, असा आरोप डिंपल यादव (Dimple Yadav) यांनी केला आहे.

(हेही वाचा – NIA Raid : एनआयएची बंगळुरू मध्ये छापेमारी; दहशतवादी कट रचला जात असल्याचा संशय)

पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष अनुपस्थित

१३ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी १३ डिसेंबर २००१ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर पंतप्रधान मोदी मध्यप्रदेश (Madhya Pradesh) आणि छत्तीसगडच्या (Chhattisgarh) मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी रवाना झाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.